"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
काटी | उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील सुरतगाव येथील वडार वस्तीतील गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावणारा पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न अखेर कायमचा सुटला आहे. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमदारांच्या पुढाकाराने वस्तीत नवीन बोअरवेल घेवून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. ऐन वाढदिवशीच पाणी मिळाल्याने वस्तीतील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
सुरतगाव हे भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आणि हक्काचे गाव मानले जाते. लोकसभा, विधानसभा असो वा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, सुरतगावाने नेहमीच पाटील यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहत मोठा मताधिक्य (लीड) दिला आहे. त्यामुळे गावाच्या विकासाकडे कधीही दुर्लक्ष होणार नाही, असा विश्वास आमदार पाटील यांनी वेळोवेळी व्यक्त केला आहे.
तत्परतेने निधी आणि कार्यकर्त्यांचे योगदान
वडार समाजातील भीषण पाणीटंचाईची माहिती मिळताच आमदार पाटील यांनी तातडीने ₹५०,०00 रुपयांची आर्थिक मदत उपलब्ध करून दिली. उर्वरित उर्वरित आवश्यक रक्कम पाटील यांच्या स्थानिक समर्थक कार्यकर्त्यांनी लोकवर्गणीतून जमा केली आणि तातडीने बोअरवेलचे काम हाती घेतले.
२९ जुलै रोजी अर्चनाताई पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या बोअरवेलचे लोकार्पण करण्यात आले. बोअरवेलला मुबलक पाणी लागल्याने वडार वस्तीतील महिला आणि नागरिकांचा पाण्यासाठी होणारा त्रास पूर्णपणे थांबला आहे.
"आमच्या वस्तीचा पाणीप्रश्न अत्यंत बिकट होता. अर्चनाताईंच्या वाढदिवशी राणा दादांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धावून येत ही बोअरवेल मंजूर करून दिली. त्यामुळे आमची मोठी अडचण दूर झाली आहे."
— वडार समाज ग्रामस्थ, सुरतगाव
लोकार्पण प्रसंगी मान्यवरांची उपस्थिती
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी आणि उद्घाटनाप्रसंगी सरपंच द्रौपदी प्रकाश गुंड, उपसरपंच बाबासाहेब गुंड, ग्रामपंचायत सदस्य आबा गुंड, माजी सरपंच भामाबाई देवकर, विजय देवकर, गणेश गुंड, राम गुंड, सामाजिक कार्यकर्ते सुनील नकाते, सुरेश गुंड, मार्गदर्शक नवनाथ सुरते, सिद्राम धोत्रे, शिवाजी देवकर, मरगू देवकर, संतोष आनंदकर, संतोष देवकर, रामू धोत्रे, गणेश धोत्रे, राजाराम धोत्रे, लक्ष्मण धोत्रे, तानाजी माने, विजय धोत्रे, किशोर आनंदकर, बालाजी देवकर, अशोक आनंदकर, इरफान शेख, अर्जुन धोत्रे, काशिनाथ धोत्रे, सतीश धोत्रे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
0 Comments