धाराशिव | प्रा. अभिमान हंगरगेकर
शहर अधिक निसर्गरम्य आणि पर्यावरणपूरक बनवण्याच्या उद्देशाने 'आपलं हरित धाराशिव वृक्ष फाऊंडेशन'च्या वतीने रविवारी (दि. २६) रेल्वे स्टेशन रोड परिसरातील कृष्णा रेसिडेन्सी येथे विशेष वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली. या उपक्रमात ३६ विविध प्रकारच्या देशी झाडांची लागवड करण्यात आली.
शहरातील प्रसिद्ध कान-नाक-घसा तज्ज्ञ आणि आय. एम. ए. (IMA) महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष डॉ. सचिन (बापूजी) देशमुख तसेच प्रसिद्ध ऑडिओलॉजिस्ट डॉ. श्रीगणेश चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
धाराशिव येथील रेल्वे स्टेशन रोड परिसरातील कृष्णा रेसिडेन्सी येथे 'आपलं हरित धाराशिव वृक्ष फाऊंडेशन'तर्फे वृक्षारोपण करताना संस्थापक अध्यक्ष सुमित बागल, डॉ. सचिन देशमुख, डॉ. गणेश चव्हाण व इतर सदस्य.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी स्थानिक वातावरणानुसार वाढणाऱ्या देशी झाडांना प्राधान्य देत २२ कडुलिंब, २ वड, २ पिंपळ, २ करंजी आणि ८ बकुळ अशा एकूण ३६ देशी रोपांची लागवड करण्यात आली. केवळ रोपे लावण्यावर न थांबता त्यांच्या संवर्धनाची आणि संगोपनाची जबाबदारीही फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे.
तरुण वृक्षप्रेमी सुमित चंद्रकांत बागल व त्यांच्या सहकाऱ्यांनी एकत्र येत 'आपलं हरित धाराशिव वृक्ष फाऊंडेशन'ची स्थापना केली असून, या माध्यमातून शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे कार्य धडाडीने सुरू आहे.
या प्रसंगी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुमित बागल यांच्यासह प्रा. अभिमान आबा हंगरगेकर, प्रमोद हुग्गे, प्रकाश पारवे, अमरसिंह गोरे, प्रविण देशमुख, राहुल बाराखडे, नसीर भाई शेख, सचिन मोरे, प्रविण गोरे, प्रसाद साळुंके, महेश देशमुख, रोहित बागल, तानाजी बचाटे, डॉ. गणेश चव्हाण, बाळासाहेब केदार, मनोज सरडे, महेश उंबरे, रोहित माने, नागेश काकडे, पवन सुर्यवंशी, डॉ. रमेश जाधव, विनायक नागरगोजे, प्रदीप (भाऊसाहेब) देशमुख, रणजित कांदे आणि शुभम माने आदी मान्यवर व सदस्य उपस्थित होते.
0 Comments