Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

गुरु पौर्णिमेनिमित्त काटी येथे भजनाचा गजर; दत्त मंदीरात भाविक तल्लीन

'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
काटी | उमाजी गायकवाड 
 गुरु पौर्णिमेनिमित्त तुळजापूर तालुक्यातील काटी येथे बुधवार दि.29 रोजी सायंकाळी येथील दत्त मंदीरात भजन गायनाचा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला. 

या कार्यक्रमामुळे संपूर्ण मंदीर परिसर भक्तीमय झाला होता. ह.भ.प. सुनिल ढगे महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भजनाचा सोहळा पार पडला.

महाराजांसह मनोहर कदम, बाळासाहेब मासाळ, कल्याण गाटे, राम घडमोडे, दत्ता कवठे, राजेंद्र गाटे,आणि गोवर्धन गाटे या भजन मंडळींनी आपल्या सुरेल आणि ओजस्वी आवाजात एकापेक्षा एक सरस भजने सादर केली. दत्त, विठ्ठल, आणि संतांच्या  भजनांनी उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. 

भजनाच्या तालावर अनेक भाविक तल्लीन झाले होते. मंदीर परिसरात फुलांची आणि रोषणाईची सजावट करण्यात आली होती. गुरु पौर्णिमेच्या औचित्याने गुरूंच्या महात्म्याचे महत्वही यावेळी सांगण्यात आले.

गावातील ग्रामस्थ, महिला आणि तरुण मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते. ग्रामस्थांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी झाला.

कार्यक्रमाच्या शेवटी महाआरती करून प्रसादाचे वितरण करण्यात आले.

Post a Comment

0 Comments