Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

दैनिक 'पुण्य नगरी'च्या द्वितपपूर्ती विशेषांकाचे शनिवारी तुळजापुरात प्रकाशन;श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी अर्पण; प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते सोहळा पार पडणार


पुण्य नगरी न्यूज नेटवर्क
धाराशिव:
महाराष्ट्रासह देशभरात आपल्या निष्पक्ष आणि धडाकेबाज पत्रकारितेचा ठसा उमटवणाऱ्या अग्रगण्य 'दैनिक पुण्य नगरी' समूहाच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त प्रकाशित होणाऱ्या 'द्वितपपूर्ती विशेषांकाचे' शनिवारी (दि. १ ऑगस्ट) कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या पावन भूमीत तुळजापूर येथे थाटात लोकार्पण होणार आहे.

जिल्ह्याची प्रशासकीय धुरा सांभाळणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी सकाळी १० वाजता श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात हा प्रकाशन सोहळा रंगणार आहे.

प्रशासकीय नेतृत्वाची प्रमुख उपस्थिती
या सोहळ्यास मुख्य अतिथी म्हणून:

किर्ती किरण पुजार (जिल्हाधिकारी, धाराशिव)

प्रियंवदा महाडदळकर (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद)

रितु खोखर (पोलीस अधीक्षक)

विद्याचरण कडवकर (निवासी उपजिल्हाधिकारी)

यांच्यासह इतर सनदी अधिकारी व मान्यवरांच्या हस्ते विशेषांक श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी अर्पण करून त्याचे अधिकृत प्रकाशन करण्यात येणार आहे.

२४ वर्षांची यशस्वी वाटचाल आणि वाचकांचे अढळ नाते
मराठी भाषेत दैनिक पुण्य नगरी, आपला वार्ताहर, मुंबई चौफेर या दैनिकांसह हिंदी, कन्नड आणि तामीळ भाषांमधून वाचकांच्या मनावर राज्य करणाऱ्या 'पुण्य नगरी' समूहाने आज यशस्वी २४ वर्षे पूर्ण केली आहेत. सर्वसामान्यांचे प्रश्न, तळागाळातील समस्यांना वाचा फोडत 'पुण्य नगरी'ने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, प्रत्येक घरोघरी विश्वासाचे दृढ नाते निर्माण केले आहे.

वाचक, जाहिरातदार, वृत्तपत्र विक्रेते आणि सर्व हितचिंतकांच्या भक्कम पाठबळावरच 'पुण्य नगरी' आज अग्रगण्य वृत्तपत्र समूह म्हणून 'द्वितपपूर्ती'चा टप्पा यशस्वीरीत्या पार पाडत आहे.

उपस्थित राहण्याचे आवाहन:

"या आनंदाच्या क्षणी १ ऑगस्ट रोजी श्री तुळजाभवानी देवीच्या दरबारात होणाऱ्या विशेषांक लोकार्पण सोहळ्यास जिल्ह्यातील सर्व वाचक, वृत्तपत्र विक्रेते, वितरक, जाहिरातदार आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे," असे आवाहन दैनिक 'पुण्य नगरी'चे वृत्त संपादक तथा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments