Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

यमगरवाडीच्या आश्रमशाळेतील गुणवंत शिक्षकांचा गौरव; शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांचे देदीप्यमान यश


'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
काटी | उमाजी गायकवाड 
भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान संचलित एकलव्य प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा (मंगरूळ-यमगरवाडी, ता. तुळजापूर) येथील गुणवंत कर्मचाऱ्यांचा आणि शिक्षकांचा नुकताच एका विशेष समारंभात गौरव करण्यात आला. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा आलेख उंचावण्यासाठी आणि विविध स्तरांवरील शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना यश मिळवून देण्यासाठी अहर्निश परिश्रम घेणाऱ्या शिक्षकांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

या शैक्षणिक वर्षात आश्रमशाळेतील इयत्ता चौथी, पाचवी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. यामध्ये इयत्ता सातवीतील साक्षी घोरपडे व गणेश शिंदे; इयत्ता पाचवीतील ज्ञानेश्वरी भोजने व शिनोकर मुळे आणि इयत्ता चौथीमधील विनोद कांबळे या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीधारक बनण्याचा बहुमान मिळवला. प्रतिकूल परिस्थितीतून येणाऱ्या या विद्यार्थ्यांना नियमित वेळेव्यतिरिक्त ज्यादा तास घेऊन, विशेष मार्गदर्शन करणाऱ्या श्रीमती प्रणिताबाई शेटकार, अनिल घुगे आणि हरीश मगदूम या शिक्षकांचा संस्थेच्या वतीने विशेष गौरव करण्यात आला.

तसेच, संस्थेच्या वतीने शाळा परिसरात सध्या विविध रचनात्मक बांधकामे व पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. या विकासकामांवर विशेष देखरेख ठेवणे आणि संस्थेसाठी विविध स्तरांतून साहाय्य मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिल्याबद्दल शालिवाहन वाघमोडे यांचाही यावेळी यथोचित सत्कार करण्यात आला.

"संस्थेने केलेल्या या गौरवार्थ सन्मानामुळे आमचे मनोबल कमालीचे वाढले आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अधिक उमेदीने आणि ऊर्जेने काम करण्याची प्रेरणा यातून मिळाली आहे."
— श्रीमती प्रणिता शेटकार व अनिल घुगे (सत्कारमूर्ती शिक्षक)

या सोहळ्याला भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष उद्धवराव काळे, उपाध्यक्ष डॉ. अभय शहापूरकर, कार्यवाह विवेक अयाचित, संचालक ॲड. प्रवीणसिंह परदेशी, अशोक संकलेचा, कोषाध्यक्ष नरेश पोटे, डॉ. प्रणिता गडेकर, अभय कुलकर्णी, नाना शिर्के, विजय गिजरे यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments