तुळजापूर | 'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी भाविकांकडून अर्पण केल्या जाणाऱ्या दानांची परंपरा अखंड सुरू आहे. याच भाविकतेतून पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील पांगरे येथील रहिवासी अभिजीत विलास काकडे यांनी मंगळवारी श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी ९६७ ग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा टोप अत्यंत श्रद्धेने अर्पण केला.
अभिजीत काकडे हे आपल्या सहकुटुंबासह श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी तुळजापूर येथे आले होते. यावेळी त्यांनी मंदिरात परंपरेनुसार कुलधर्म-कुलाचार पार पाडत श्री तुळजाभवानी देवीची विधीवत ओटी भरली आणि भावपूर्ण दर्शन घेतले. दर्शन सोहळ्यानंतर त्यांनी ९६७ ग्रॅम वजनाचा कलात्मक चांदीचा टोप श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी अर्पण केला.
या भक्तिमय प्रसंगी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने दाते अभिजीत काकडे यांचा शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. या धार्मिक उपक्रमाच्या वेळी महेश गंजे यांच्यासह मंदिर संस्थानचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments