Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानास 'नाईब लिमिटेड'कडून अत्याधुनिक स्वच्छता यंत्रसामग्री भेट; CSR उपक्रमातून सामाजिक बांधिलकी

'Only न्यूज धाराशिव' वृत्तसेवा

तुळजापूर | उमाजी गायकवाड 

महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शन मंडप आणि मंदिर परिसर स्वच्छतेसाठी 'नाईब (Nibe) लिमिटेड' (चाकण, पुणे) या कंपनीने सीएसआर (CSR) उपक्रमांतर्गत अत्याधुनिक स्वच्छता यंत्रसामग्री मंदिर संस्थानास भेट दिली आहे. या आधुनिक उपकरणांमुळे मंदिर परिसरातील स्वच्छता अधिक गतिमान आणि कार्यक्षम होण्यास मदत होणार आहे.


श्री तुळजाभवानी मंदिर हे महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र असल्याने येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. भाविकांना स्वच्छ, आरोग्यदायी आणि प्रसन्न वातावरण मिळावे यासाठी मंदिर संस्थानकडून स्वच्छतेला नेहमीच प्राधान्य दिले जाते. याच पार्श्वभूमीवर नाईब लिमिटेडने सामाजिक बांधिलकी जप जपत ही स्वच्छता यंत्रे उपलब्ध करून दिली आहेत. या मदतीमुळे भाविकांना अधिक चांगल्या सुविधा देण्याच्या संस्थानाच्या प्रयत्नांना मोठे बळ मिळणार असून, मंदिर संस्थानाच्या वतीने नाईब लिमिटेडचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

या प्रसंगी तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, जयसिंग पाटील, नागेश शितोळे, मंदिर संस्थानचे स्वच्छता निरीक्षक सूरज घुले, अक्षय साळुंखे, नितीन भोयर यांच्यासह मंदिर संस्थानचे अधिकारी, कर्मचारी आणि बीव्हीजी (BVG) कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments