Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

आरळी बु. येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करा; जिल्हा परिषद सदस्या सीमाताई माडजे यांची आरोग्य अधिकाऱ्यांकडे मागणी; आरळी बु. येथील 'पीएचसी' मंजुरीसाठी सीमाताई माडजेंचा पुढाकार; अनेक वर्षांपासूनचा प्रस्ताव प्रलंबित; तातडीने मंजुरी देण्याची निवेदनाद्वारे विनंती

धाराशिव | 'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
तुळजापूर तालुक्यातील मौजे आरळी बु. येथे प्राथमिक आरोग्य केंद्र (पीएचसी) मंजूर करण्याचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद प्रशासनाकडे प्रलंबित आहे. हे आरोग्य केंद्र तात्काळ मंजूर करून या भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या सौ. सीमाताई भैरवनाथ माडजे यांनी केली आहे. या संदर्भातील एक सविस्तर निवेदन त्यांनी आज जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद धाराशिव यांना प्रत्यक्ष भेटून दिले.

आरळी बु. आणि परिसरातील गावांची लोकसंख्या लक्षात घेता, या भागात तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू होणे अत्यंत गरजेचे आहे. येथील नागरिकांना किरकोळ आजारांवरील उपचारांसाठी किंवा आपत्कालीन परिस्थितीत दूरवर प्रवास करावा लागतो. यामुळे रुग्णांचे नाहक हाल होतात. हीच समस्या लक्षात घेऊन आरळी बु. येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता, परंतु तो अद्याप मंजूर झालेला नाही.

या पार्श्वभूमीवर, आज सौ. सीमाताई माडजे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची भेट घेतली. या प्रलंबित प्रस्तावाला प्रशासनाने तातडीने मंजुरी द्यावी आणि आरळी बु. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम विनाविलंब सुरू करावे, अशी आग्रही मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनीही यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.

निवेदन देतेवेळी जिल्हा परिषद सदस्या सीमाताई माडजे-रोचकरी यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते भैरवनाथ माडजे, ॲड. उदय भोसले व इतर मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments