Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर जिल्हा परिषद प्रशासन तातडीने मार्ग काढावा: जि. प. सदस्या सौ. सिमाताई माडजे; मागण्या पूर्ण न झाल्यास साखळी व अमरण उपोषणाचा इशारा; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले निवेदन


धाराशिव | Only न्युज धाराशिव वृत्तसेवा
धाराशिव जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या प्रलंबित आणि रास्त मागण्यांबाबत जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी जिल्हा परिषद सदस्या सौ. सिमाताई भैरवनाथ माडजे यांनी केली आहे. धाराशिव जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समितीने मांडलेल्या मागण्यांचा तातडीने निपटारा न झाल्यास शिक्षकांनी साखळी उपोषण आणि अमरण उपोषणाचा इशारा दिला असून, याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), जिल्हा परिषद धाराशिव यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

सौ. सिमाताई माडजे यांनी निवेदनाद्वारे शिक्षकांच्या विविध ज्वलंत समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. यात प्रामुख्याने शिक्षण विस्ताराधिकारी पदोन्नती प्रक्रियेतील अनियमितता रद्द करून पात्र शिक्षकांची नव्याने सेवाज्येष्ठता यादी तयार करणे, तसेच एकाच कॅम्पसमध्ये एकत्रित केलेल्या प्राथमिक व माध्यमिक शाळा पूर्ववत स्वतंत्र करण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनातील प्रमुख मागण्या:
पदोन्नती रद्द करून नवीन यादी: शिक्षण विस्ताराधिकारी पदोन्नतीमध्ये झालेल्या गैरप्रकार व अनियमिततेची दखल घेऊन झालेली पदोन्नती रद्द करावी आणि पात्र शिक्षकांची नव्याने सेवाज्येष्ठता यादी तयार करावी.

शाळा पूर्ववत स्वतंत्र कराव्यात: एकाच कॅम्पसमधील एकत्र केलेल्या प्राथमिक व माध्यमिक शाळा पूर्ववत स्वतंत्र करण्यात याव्यात.

निवडश्रेणी व पदवीधर पदे: प्रलंबित असलेली निवडश्रेणी पात्र शिक्षकांना तातडीने मंजूर करावी. तसेच रिक्त असलेली भाषा व गणित/विज्ञान विषयांची प्राथमिक पदवीधर पदे प्राथमिक शिक्षकांमधून दर्जावाढीने भरावीत.

जुनी पेन्शन व वरिष्ठ वेतनश्रेणी: नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या जाहिरातीतील पात्र शिक्षकांना जुनी पेन्शन योजना (OPS) लागू करावी, तसेच १२ वर्षे सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ द्यावा.

कोविड काळातील पुरस्कार व निधी: कोरोना काळात प्रलंबित राहिलेल्या जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्कारांचे वितरण तातडीने करावे. तसेच कोरोना काळात शिक्षकांनी जमा केलेल्या १ कोटींहून अधिक निधीचा पारदर्शक व योग्य विनियोग करावा.

आर्थिक तरतूद: वैद्यकीय पुरवणी देयकांसाठी आवश्यक असणारी आर्थिक तरतूद करून संबंधित निधी तातडीने मंजूर करण्यात यावा.

जिल्हा परिषदेच्या अर्थ व नियोजन समिती तसेच पशु व दुग्धविकास समितीच्या सदस्या आणि मंगरूळ गटाच्या आरोग्य कल्याण समितीच्या अध्यक्षा असलेल्या सौ. सिमाताई माडजे यांनी शिक्षकांच्या या रास्त मागण्यांसाठी प्रशासनाने तत्परता दाखवून लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी आग्रही विनंती केली आहे.

Post a Comment

0 Comments