Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

मंगरुळचे माजी पोलीस पाटील कमलाकर साठे पाटील यांचे निधन;गावपातळीवर तंटामुक्त वातावरणासाठी मोलाचे योगदान; मंगरुळमध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

मंगरुळ | 'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
तुळजापूर तालुक्यातील मौजे मंगरुळ येथील माजी पोलीस पाटील कमलाकर साठे पाटील (वय 85) यांचे रविवार, ९ ऑगस्ट रोजी राहत्या घरी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. परिसरामध्ये 'आप्पा' या आदरयुक्त टोपण नावाने ओळखल्या जाणाऱ्या साठे पाटील यांच्या निधनाने मंगरुळ व परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

आपल्या कार्यकाळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात आप्पांचा मोठा हातखंडा होता. गावात किंवा परिसरात निर्माण होणारे लहान-मोठे तंटे व वादविवाद शांततेच्या मार्गाने आणि सामोपचाराने मिटवण्यात त्यांचा विशेष पुढाकार असायचा. पोलीस प्रशासनाला वेळोवेळी सहकार्य करत त्यांनी गावपातळीवर सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्यासाठी भरीव योगदान दिले. एक सर्वसमावेशक, अभ्यासू आणि लोकसंग्रह जपणारे व्यक्तिमत्व म्हणून संपूर्ण तालुक्यात त्यांचा मोठा नावलौकिक होता.

त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच मंगरुळसह आसपासच्या गावांतील नागरिकांनी त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. सायंकाळी मंगरुळ येथील त्यांच्या शेतात हजारो ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.

त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने मंगरुळ गावाने एक अनुभवी आणि मार्गदर्शक नेतृत्व गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments