Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

झोपडपट्टी शाळा समिती अध्यक्षपदी महेश गुंड यांची निवड;पालकांच्या मोठ्या उपस्थितीत विशेष सभा संपन्न


काटी | Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
तुळजापूर तालुक्यातील सुरतगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा, झोपडपट्टी येथे 8 ऑगस्ट रोजी सुरतगावच्या नवीन शाळा व्यवस्थापन समितीची निवड गुरुवारी विशेष पालकसभेत सर्वानुमते करण्यात आली. अध्यक्षपदी महेश गुंड  यांची निवड झाली असून उपाध्यक्षपदी प्रमिला गायकवाड यांची निवड झाली आहे.  

शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रत्येक शाळेत शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. याच अनुषंगाने मुख्याध्यापक दयानंद जवळगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष सभा आयोजित करण्यात आली होती.  

सभेच्या सुरुवातीला मागील समितीच्या कामाचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर नवीन समितीसाठी नावे सुचविण्यात आली. यावेळी उपस्थित पालकांनी एकमताने महेश गुंड यांच्या नावाला पसंती दर्शवली. त्याचप्रमाणे उपाध्यक्षपदासाठी प्रमिला गायकवाड यांची निवड करण्यात आली.  

> "शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्यासाठी पालक आणि शिक्षकांनी एकत्रितपणे काम करावे लागेल. मुलांना दर्जेदार शिक्षण मिळणे हीच आमची प्राथमिकता असेल"
> - नवनियुक्त अध्यक्ष महेश गुंड

निवडीनंतर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून विश्वास व्यक्त केला.  

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक दयानंद जवळगांवकर यांनी केले. समितीच्या माध्यमातून शाळेतील पायाभूत सुविधा वाढवणे, पटसंख्या वाढ आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करू, असे ते म्हणाले. सूत्रसंचालन शिक्षिका वैशाली आडम यांनी केले. आभार शिक्षक प्रतिनिधींनी मानले.  

सभेला ग्रामपंचायत सदस्य, माजी विद्यार्थी आणि गावातील मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments