Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

धाराशिव जिल्हा काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी राजाभाऊ शेंडगे यांची निवड

तुळजापूर | Only न्युज धाराशिव वृत्तसेवा 
 तुळजापूर तालुक्यातील युवा नेते राजाभाऊ शेंडगे यांची काँग्रेसच्या धाराशिव जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे तुळजापूर तालुक्यासह जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

राजाभाऊ शेंडगे हे काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ व सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांनी मागील दहा वर्षांपासून तुळजापूर तालुका ओबीसी काँग्रेस अध्यक्ष म्हणून काम करत संघटन मजबूत करण्यासाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची जाणीव ठेवून सातत्याने पाठपुरावा करणारे नेतृत्व म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तसेच तळागाळातील कार्यकर्ते आणि नागरिकांशी त्यांचा व्यापक जनसंपर्क आहे.

त्यांच्या संघटनात्मक कार्याची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे. या निवडीमुळे जिल्ह्यातील काँग्रेस संघटना अधिक बळकट होण्यास मदत होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
राजाभाऊ शेंडगे यांच्या जिल्हा उपाध्यक्षपदी झालेल्या निवडीबद्दल पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments