Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काँग्रेसच्या धाराशिव जिल्हा उपाध्यक्षपदी सयाजीराव देशमुख यांची पुनर्नियुक्ती

'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
काटी  | उमाजी गायकवाड 
 तुळजापूर तालुक्यातील काटी येथील ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते सयाजीराव विजयसिंह देशमुख यांची काँग्रेसच्या धाराशिव जिल्हा उपाध्यक्षपदी पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे. यापूर्वी 29 जुलै 2024 रोजी त्यांच्याकडे जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यांच्या कार्याची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर पुन्हा विश्वास व्यक्त केला आहे.
सयाजीराव देशमुख हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत व तळागाळातील कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने काम केले आहे. सामाजिक आणि सहकार क्षेत्रातही त्यांचे उल्लेखनीय योगदान राहिले आहे.

देशमुख यांनी संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य म्हणून काम पाहिले असून, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदाची जबाबदारीही त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे. तसेच ते सध्या कुलस्वामिनी सहकारी सुतगिरणीचे विद्यमान संचालक म्हणून कार्यरत आहेत.

त्यांच्या काँग्रेसच्या धाराशिव जिल्हा उपाध्यक्षपदी झालेल्या पुनर्नियुक्तीबद्दल पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते, सहकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments