Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तुळजाभवानी देवीच्या चरणी विभागीय आयुक्त जी. श्रीकांत; विकासकामांचीही पाहणी


तुळजापूर | 'Only  न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन विधिवत आरती केली. त्यांच्या अध्यक्षतेखाली तुळजापूर येथे जिल्हास्तरीय विविध विभागांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी ते तुळजापूर येथे आले होते.
दर्शनानंतर विभागीय आयुक्त श्री. श्रीकांत यांनी श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात सुरू असलेल्या विविध विकासकामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी विकासकामांची सद्यस्थिती, प्रगती तसेच आगामी नियोजनाबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली.

दरम्यान, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या अध्यक्ष कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते त्यांना कवड्याची माळ व श्री तुळजाभवानी देवीची प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी तहसीलदार तथा विश्वस्त, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, अरविंद बोळंगे यांच्यासह मंदिर संस्थानचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments