Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

इंडस गूळ पावडर कारखान्याची नोव्हेंबर पर्यंतची बिले शेतकरी खात्यावर जमा; इंडस गुळ पावडर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची विश्वासाहर्ता जपली; ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधान

काटी/उमाजी  गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी पासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावरील बार्शी तालुक्यातील हात्तीज  येथील इंडस ऑर्गो फार्मर्स अलाईड इंडस्ट्रिज प्रा.लि. हा गूळ पावडर उद्योग या वर्षी वाढीव क्षमतेने सुरु करण्यात आला आहे. या कारखान्याने नोव्हेंबर 2023 मधील ऊस बिले ठरल्या प्रमाणे पहिला हप्ता उचल म्हणून प्रती टन 2600 रु. प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहेत. सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील व परिसरातील इतर साखर कारखान्याच्या सरासरी तुलनेने अंतिम दरही निश्चित करून दिला जाईल असा शब्द कारखाना प्रशासनाच्या वतीने चेअरमन अमर साहेबराव मोरे यांनी दिला आहे.

 मागील वर्षी देखील या गूळ उद्योगाने अंतिम दर 2350/- रुपये प्रती टन दिलेला आहे. 10 तासाच्या आत शेतकऱ्यांच्या ऊसाचे गाळप, ऊस काट्याबद्दल असलेली विश्वासाहर्तता आणि दिलेल्या शब्दाप्रमाणे बिल या गोष्टींमुळे परिसरातील शेतकऱ्यांचा कल या गुळ पावडर उद्योगास ऊस देण्याकडे मोठ्याप्रमानावर झुकत असल्याचे दिसून येते आहे. कारखान्याचा  2023-24 चा गळीत हंगाम यशस्वीरित्या सुरु असून शेतकरी हाच केंद्रबिंदू  मानून कारखान्याची वाटचाल सुरु आहे. परिसरातील शेतकऱ्यांसाठी ऊस विकासाचे धोरण आखून संकटकालीन परिस्थितीत देखील शेतकऱ्यांना सल्ला, मार्गदर्शन व मदत करण्याचे पुढील कठीण परिस्थितीत कारखान्याचे धोरण असल्याबाबत कारखान्याच्या शेतकी विभागाने सांगितले आहे. तसेच कारखाना परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी, सभासद यांनी आपला ऊस इंडस ऑर्गो फॉर्मर्स अलाईड इंडस्ट्रीज प्रा. लिमिटेड या गुळ पावडर कारखान्याला पाठवावा असे आवाहन चेअरमन अमर मोरे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments