Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

आगामी निवडणुकीत दक्षिण मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकणार; मंद्रूपच्या दौऱ्या दरम्यान उपनेत्या अस्मिता गायकवाड यांना विश्वास

मंद्रूप:- सोलापूर दक्षिण तालुका व संपूर्ण मतदार संघ हा खरा शिवसेनेचा  बालेकिल्ला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विचार सरणीला मानणारा एक स्वतंत्र वर्ग आहे.यापुर्वी एकदा शिवसेनेला संधी येथील मतदारानी दिली   होती. आता पुन्हा ते आमदार निवडून आणून पुनरावृत्ती करतील आसा विश्वास शिवसेनेच्या कणखर नेत्या म्हणून ओळख असणाऱ्या अस्मिताताई गायकवाड यांनी व्यक्त केला.


शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेता अस्मिता ताई गायकवाड यांनी जिल्ह्यात पदाधिकारी सुसंवाद दौऱ्याला सुरूवात केलेली आहे. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी अक्कलकोट सह दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचा  दौरा त्यांनी केला . मंद्रूप येथे झालेल्या बैठकीत गायकवाड यांनी आपण गावागावात ,वाडी वस्ती मध्ये जाऊन आपले पक्षसंघटन बळकट कसे करायचे, जनतेचे मुलभूत प्रश्न कसे शोधायचे यांचे मार्गदर्शन या दौऱ्याचे दरम्यान केले.
 
जिल्हा प्रमुख अमर पाटील, युवतीसेना अधिकारी पूजा खंदारे व शिवसेना शहरप्रमुख शरणराज केगनाळकर यांनी अस्मिता गायकवाड यांची उपनेतेपदी निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त करून त्यांना शुभेच्छा दिल्या 
     
अमर पाटील म्हणाले की, गायकवाड ताईचे काम आम्ही कित्येक वर्षांपासून पहात आहोत, त्या एक झुंजार नेत्या आहेत,यश खेचून आण्याचं सामर्थ्य त्यांच्यात आहे त्यामुळे आगामी निवडणुकीत विजय आपलाच आसेल, पूजा खंदारे व शरण राज केंगनाळकर यांनीही अस्मिताताईंच्या कामाचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या, दक्षिण सोलापूर शिवसेनेच्या वतीने अस्मिता ताई गायकवाड यांचा भव्य सत्कार करण्यात आला, तसेच सर्व पदाधिकाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला, सकलेश्वर मठाचे मठाधिपती आप्पाजी स्वामी यांच्या हस्ते आप्पाजी स्वामी यांनीही अस्मिता ताई गायकवाड अमर पाटील सत्कार करून त्यांना अनेक शुभ आशीर्वाद दिले. रात्री ९. वा.देखील नागरीक व शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती 
     


मंद्रूप दौऱ्या दरम्यान बैठकीसाठी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील, मोठे आप्पाजी, युवा सेना जिल्हाप्रमुख बालाजी चौगुले,  सोशल मीडिया समन्वयक अजित स्वामी, विधानसभा प्रमुख भीमाशंकर म्हेत्रे, राजू बिराजदार,शशिकला चिवडशेट्टी योगीराज चिवडशेट्टी, मंगल थोरात, प्रीती नायर, स्वाती रुपनर, प्रभावती एलगुंडे रमा सरोदे ,संतोषी भोळे आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments