Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

अखेर गंजेवाडी ते तामलवाडी बस सेवा सुरु; विद्यार्थ्यांची पायपीट संपली

काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील गंजेवाडी ते तामलवाडी बस सेवा अखेर सोमवार दि. 4 रोजी सुरु करण्यात आली. 

गंजेवाडी येथील 5 वी.ते 12 वी.वर्गातील 57 विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी तामलवाडी येथील सरस्वती विद्यालयात जातात बरेच विद्यार्थी हे पायी चालत तर काही विद्यार्थी सायकलवर जात होते. अशा विद्यार्थ्यांना तामलवाडी येथे जाणे - येण्यासाठी गंजेवाडी गावांचे सरपंच फिय्याज शेख यांनी विशेष परिश्रम घेतले.विद्यार्थ्यांना तामलवाडी येथे शिक्षण घेण्यासाठी दररोज जी कसरत करावी लागत होती ती समस्या सोडवून व सर्व विद्यार्थ्यांना स्वतः मोफत पास काढून दिले.तसेच वेळोवेळी महामंडळास पञव्यवहार करुन विद्यार्थ्यांची चांगली सोय करुन दिल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक करुन धन्यवाद मानले जात आहे.त्याचबरोबर गावचे उपसरपंच श्री.जांबुवंत गंजे,सर्व ग्रामपंचायत सदस्य,ग्रामस्थ व सरस्वती विद्यालयाचे प्राचार्य श्री.सुहास वडणे सर यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments