Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तुळजापूरचा युवा चित्रकार दिग्विजय कुंभार यांच्या चित्रांचे मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीतील प्रदर्शनात भाजपचे गुलचंद व्यवहारे यांची भेट

तुळजापूर:- तुळजापूर येथील युवा चित्रकार दिग्विजय कुंभार यांच्या चित्रांचे प्रदर्शन मुंबईच्या जगप्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलरीत भरवण्यात आले आहे. हे चित्रप्रदर्शन 4 ते 10 डिसेंबर या कालावधीत भरवण्यात आलेले आहे .

तुळजापूर  येथील युवा चित्रकार  दिग्विजय कुंभार यांच्या चित्रांची महाराष्ट्रात नव्हे तर दिल्ली, राजस्थान, गुजरात आदी राज्यांत   आपल्या चित्रांचे प्रदर्शनात सहभाग घेत तुळजापूरच्या नावाचा डंका देशभरात गाजवला.

चित्रकार दिग्विजय कुंभार यांच्या जहांगीर आर्ट गॅलरीतील  प्रदर्शनाच्या  उद्घाटनप्रसंगी तुळजापूरचे  सुपुत्र तथा भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य गुलचंद व्यवहारे यांनी सोमवार दि. 4 रोजी भेट दिली.
जीवनातील व जगण्यातील ही सकारात्मकता या चित्रातून दाखविणाऱ्या या चित्र प्रदर्शनात दिग्विजय कुंभार यांनी साकारलेल्या चित्रांचा समावेश होता.

यावेळी  भाजपचे  प्रदेश कार्यकारिणी सदस्य गुलचंद व्यवहारे, शिल्पकार डॉ. उत्तम पाचारणे, प्रा. राजेंद्र पाटील आदीजण उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments