Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

पेन्शन जनक्रांती महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर आयोजित बाईक रॅलीचे बाईक स्वार सोनार मामा यांचे तुळजापूर नगरीत भव्य स्वागत

तुळजापूर:- 12 डिसेंबर 2023 रोजी नागपूर येथे होणाऱ्या जनक्रांती पेन्शन मोर्चाची जनजागृती करण्यासाठी जळगाव ते नागपूर 20 जिल्ह्यातून प्रवास करण्यासाठी निघालेले पेन्शन शिलेदार, संघर्ष योद्धा, जुनी पेन्शन संघटनेचे आरोग्य विभाग राज्यप्रमुख  तथा राज्य संघटक श्री. संजय सोनार कळवाडीकर यांचे तुळजापूर नगरीत भव्य स्वागत करण्यात आले. 

महाराष्ट्र राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 नंतर राज्य शासकीय व निमशासकीय सेवेतील कर्मचारी यांना जुनी पेन्शन मिळावी यासाठी नागपूर येथे जनक्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सर्व राज्यभर या मोर्चा विषयी जनजागृती करण्यासाठी संजय सोनार हे बाईकने प्रवास करत आहेत. ते तुळजापूर येथे आले असता त्यांचे तुळजापूर तालुक्याचे गट विकास अधिकारी अमोल ताकभाते व तुळजापूर मंदिर संस्थानचे व्यवस्थपक तथा तहसीलदार सोमनाथ माळी यांनी स्वागत केले. आई तुळजाभवानी चरणी जुनी पेन्शन मिळावी यासाठी सर्व पेन्शन शिलेदारांनी साकडे घातले.

 यावेळी धाराशिव सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर, पंचायत समिती तुळजापूर कनिष्ठ प्रशासन अधिकारी मगर मॅडम, सहाय्यक लेखाधिकारी रामदास जगताप, वरिष्ठ लेखा सहाय्यक अशोक कट्टे, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना तुळजापूर चे तालुकाध्यक्ष सुसेन सुरवसे, पेन्शन शिलेदार बाळासाहेब घेवारे, तुकाराम वाडकर , ज्योतिर्लिंग क्षीरसागर, केशव काळे, अजित माळी ,अतुल माळी, नागेश भोसले, राहुल जाधव, राहुल गवळी, सोमनाथ केवटे, लक्ष्मण माळी, समीर जाधव, गुरुप्रसाद भूमकर,गणेश तपासे, गट शिक्षण कार्यालय तुळजापूर येथील कनिष्ठ सहायक मल्लय्या स्वामी, तसेच रत्नदीप पंडित, राम दराडे, दिलीप गायकवाड व इतर पेन्शन फायटर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments