Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

धाराशिव येथे श्री दत्तगुरू महाराज यांच्या जन्मोत्सव सप्ताहास मंगलमय सोहळ्यात प्रारंभ; भजन, कीर्तन, ग्रंथदिंडी, महाप्रसादसह विविध कार्यक्रम

धाराशिव/प्रतिनिधी 
त्रैलोक्याचे स्वामी प.पू. श्री गुरूदेव दत्तात्रेय महाराज यांच्या जन्मोत्सनिमित्त धाराशिव येथे आयोजित गुरूचरित्र पारायण, ग्रंथदिंडी, भजन, कीर्तन, अखंड हरिनाम सप्ताहास श्री तुळजाभवानी देविजींचे महंत प.पू. तुकोजी बाबा (तुळजापूर), रुईभर येथील श्री दत्त संस्थानचे संस्थापक अप्पाबाबा महाराज (रुईभर) व हभप श्रीराम पाठक महाराज या त्रिमुर्तींच्या हस्ते मंगलमय सोहळ्यात प्रारंभ करण्यात आला़

धाराशिव शहरातील श्री सदगुरू कॉलनी, भानूनगर येथे पिताश्री श्रीमंतराव (आबा) रणदिवे प्रतिष्ठाणच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही श्री गुरूदेव दत्तात्रेय महाराज यांच्या जन्मोत्सवनिमित्त १९ ते २६ डिसेंबर या कालावधीत गुरूचरित्र पारायण, अखंड दत्तनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे़  सप्ताहचे यंदा ९ वे वर्षे आहे. मंगळवारी (दि.१९) स. १० वा. श्री तुळजाभवानी देविजींचे महंत प.पू. तुकोजी बाबा, रुईभर येथील श्री दत्त संस्थानचे संस्थापक अप्पाबाबा महाराज व हभप श्रीराम पाठक महाराज यांच्या हस्ते देव-देवतांच्या पूजन विधीने सप्ताह सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला़ यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते़.  दु. १ वा. मुक्ताई महिला भजनी मंडळाची (महात्मा गांधीनगर) भजनसेवा झाली़  सप्ताह कालावधीत विविध ठिकाणच्या महिला भजनी मंडळाची भजन सेवा होणार आहे़.सोमवारी (दि.२५)  सायं. ६ वा. शिवकुमार मोहेकर यांचा भजनसंध्या कार्यक्रम होणार आहे. 

मंगळवार दि. २६ रोजी स. १० वा. रामायणाचार्य, हभप भारत कोकाटे महाराज यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. तत्पूर्वी स. ८ वा. गुरूचरित्र ग्रंथदिंडी  तर  दु. १२ वा. श्री दत्त जन्मोत्सव सोहळा होणार आहे. 

यानंतर महाप्रसाद वाटपाने या सप्ताह सोहळ्याची सांगता होणार आहे. या सप्ताह सोहळ्याचा भाविक -भक्त, नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन पिताश्री श्रीमंतराव (आबा) रणदिवे प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष श्री धनंजय रणदिवे यांनी केले आहे़

Post a Comment

0 Comments