काटी/प्रतिनिधी
महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. या भूमीत थोर विचारवंत संत आणि समाज कार्यकर्ते होऊन गेले. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या या भूमीत अनेक संतांनी आपले योगदान देऊन सामाजिक विकास घडवला आहे.
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील गावच्या दक्षिण बाजुकडील चर्मकार समाजाच्या वतीने मंगळवार दि.19 रोजी दुपारी 12 वाजता संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या वेळी चर्मकार समाजातील युवक सुरज गायकवाड यांच्या हस्ते संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. टाळ मृदंगाच्या गजरात, भजन गायनामध्ये दुपारी 12 वाजता गुलालाची उधळण करीत मोठया भक्तीमय वातावरणात संत रोहिदास जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी माजी चेअरमन सयाजीराव देशमुख, प्रकाश गाटे, गणपत चिवरे, बाळासाहेब मासाळ, संताजी भापकर, राजेंद्र गाटे, शिवाजी चिवरे, अनंत चिवरे, सुनिल गायकवाड, धनाजी गायकवाड, मयुर गायकवाड, आकाश देवकर,नाना कांबळे, तात्या भापकर, राम घडमोडे, सुर्याजी चिवरे आदी मान्यवर उपस्थित होते.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा.....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236
0 Comments