Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाची गरज ---डॉ. सुभाष हुलपल्ले

              
मुरुम/प्रतिनिधी
 समाजात सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक प्रगती साधण्यासाठी गरीब, वंचित माणूस शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आलाच पाहिजे. संविधान तयार करताना उपेक्षितांना मोफत व सक्तीचे शिक्षण दिले पाहिजे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या हेतू त्याकाळी डॉ. आंबेडकरांनी छत्रपती संभाजी नगर येथे मिलिंद महाविद्यालयाची उभारणी करून शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार केला.माणसाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाची गरज असल्याचे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे केंद्र संयोजक डॉ. सुभाष हुलपल्ले यांनी केले. महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात आयोजित महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती, भूगोल विभाग, राष्ट्रीय सेवा योजना व श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने ३० वा विद्यापीठ नामाविस्तार दिन, जागतिक भूगोल दिन व मकर संक्रांतीचे औचित्य साधून व्याख्यानात ' डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शैक्षणिक विचार काल, आज आणि उद्या ' या विषयावर सोमवारी (ता.१५) रोजी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अशोक सपाटे होते.

यावेळी प्रा. डॉ. सतिश शेळके, प्रा. डॉ. किरणसिंग राजपूत आदिंची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस डॉ. अशोक सपाटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पुढे बोलताना डॉ. हुलपल्ले म्हणाले की, विद्यापीठ नामाविस्तार दिनाचा पूर्वतिहास सांगताना सर्वांनी जातीय दृष्टीकोन बदलून शैक्षणिक मतप्रवाह बदलणे गरजेचे आहे. शिक्षणाच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन होईल. यासाठी राजकीय लोकशाहीचे रुपांतर सामाजिक व आर्थिक दृष्टीकोनातून करणे आवश्यक आहे. नामंतराचा इतिहास सर्वांनी वाचून तो समजून घेतला पाहिजे असे ते शेवटी म्हणाले. अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्य अशोक सपाटे म्हणाले की, तरुणांनी सर्वगुण संपन्न होण्यासाठी दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊन स्वतःचा विकास साधावा. सध्या विद्यार्थ्यांसमोर विविध आव्हाने उभी असताना आपण स्वतःला काळानुरूप बदलले पाहिजे. प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, डॉ. सुजित मटकरी, डॉ. नागनाथ बनसोडे, डॉ. राजू शेख, प्रा. अशोक बावगे, डॉ. प्रतापसिंग राजपूत, डॉ. शिला स्वामी, डॉ. अविनाश मुळे, कार्यालयीन अधीक्षक राजू ढगे, महादेव पाटील, सुरेखा पाटील आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पुरुषोत्तम बारवकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. महेश मोटे तर डॉ. राम बजगिरे  यांनी आभार मानले. यावेळी विविध शाखेतील विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होत्या.                                 

मुरूम, ता. उमरगा येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात नामविस्तार दिनानिमित्त व्याख्यानाप्रसंगी बोलताना सुभाष हुलपल्ले, अशोक सपाटे, सतिश शेळके, किरणसिंग राजपूत व महेश मोटे आदी.




Post a Comment

0 Comments