काटी/उमाजी गायकवाड
राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान अंतर्गत यशदा पुणे यांच्या मार्फत शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी राजस्थान येथे दुसऱ्या टप्प्यातील अभ्यास द्वारा आयोजित करण्यात आला आहे. हा अभ्यास दौरा दि. 18 ते 24 जानेवारी या कालावधीत असणार आहे. या अभ्यास दौऱ्यात तुळजापूर तालुक्यातील काटीच्या लोकनियुक्त सरपंच सौ.आशाताई सुजित हंगरगेकर यांची निवड करण्यात आली आहे.
या अभ्यास दौऱ्यात उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिवचे सुर्यकांत भुजबळ, मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद धाराशिवचे गोडभरले, गटविकास अधिकारी अमोल ताकभाते तुळजापूर गटविकास अधिकारी उमरगा प्रशांत मरोड, काटीच्या सरपंच सौ. आशाताई सुजित हंगरगेकर,जेवळीच्या सरपंच सौ. महानंदा मोहन पनुरे,तुरोरीच्या सरपंच सौ. मयुरी नितीन जाधव,ग्रामविकास अधिकारी चैतन्य गोरे यांची निवड करण्यात आली आहे. या अभ्यास दौऱ्यात काही ग्रामपंचायतीना भेट देऊन तेथील कामकाज व विकासाबाबत माहिती घेण्यात येणार आहे. ज्यामध्ये मनरेगा, स्मशानभूमी सुशोभीकरण, वृक्षलागवड, सौरऊर्जा प्रकल्प, विविध विकासकामांचे माहिती घेतली जाणार आहे. त्याअनुषंगाने निवड झालेले सर्वजण गुरुवारी दुपारी संभाजीनगरकडे रवाना झाले असून तेथून ते राजस्थानकडे सायंकाळी 6 वाजता विमानाने जाणार आहेत.
0 Comments