सिल्लोड/ विजय काळे
सोयगाव येथील अजिंठा शिक्षण संस्था संचलित संत ज्ञानेश्वर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रम शिबिराचे मौजे माळेगाव पिंपरी येथे २ ते ८ जानेवारी या दरम्यान आयोजन करण्यात आले.
या सात दिवसीय हिवाळी शिबिराचे उद्घाटन सोयगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री अनमोल केदार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी स्वयंसेवकांना राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे आयुष्यातील महत्त्व समजून सांगितले. तसेच सदर कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ. ज्ञानेश्वर पाथ्रीकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी स्वयंसेवकांना त्यांचे कर्तव्य, जबाबदाऱ्या व आचरण कसे असावे याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिरीष पवार हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर माळेगाव पिंपरी गावच्या सरपंच सौ. साधनाताई राजपूत, उपसरपंच सुनिताताई जाधव, करिअर कट्टा समन्वयक डॉ लक्ष्मीनारायण कुरुपटवार, गावचे पोलीस पाटील मंगलदास अहिरे, भाऊ जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रदिप गोल्हारे यांनी केले तर सूत्रसंचालन कार्यक्रमाधिकारी डॉ. निलेश गावडे यांनी केले. कार्यक्रमाधिकारी डॉ.पंकज गावित यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी गावातील नागरीक, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, स्वयंसेविका आणि महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments