Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

मंगरुळ येथील माळी मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स आयोजित दसरा ते दिवाळी बंपर सोडत विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न; मोटारसायकल भाग्यवान विजेता ठरले अरळी (खुर्द) चे राहुल गायकवाड

काटी/मंगरूळ 
 तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील माळी मोबाईल व इलेक्ट्रॉनिक यांनी दसरा ते दिवाळी दरम्यान दहा हजारांपेक्षा  जास्त खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी लकी ड्रॉ च्या माध्यमातून भरघोस अशा बक्षिसांची मेजवानी देण्यात आली होती. त्यासाठी त्यांना लकी ड्रॉ चे कुपनही  देण्यात आले होते. या लकी ड्रॉ द्वारे ग्राहकांना बक्षीसे म्हणून एच.एफ. डिलक्स मोटारसायकलसह आकर्षक व भरीव बक्षिसांची ऑफर ठेवण्यात  आली होती.  या भव्य  लकी ड्रॉ ची सोडत विविध मान्यवरांच्या उपस्थितीत  सोमवार 1 जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता  काढण्यात आली.
  
प्रारंभी तुळजापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे , पोलीस हेड कॉन्स्टेबल वैभव देशमुख, ओप्पो मोबाईल वितरक शैलेश गुडे, सॅमसंगचे वितरक विक्रांत सर , श्रीकांत सर,ब्लु स्टार  वितरक फुटाणे सर, शंकर बेंडकाळे, परमेश्वर लाडुळकर, माळी मोबाईल ॲन्ड इलेक्ट्रॉनिक्सचे सर्वेसर्वा पोलीस पाटील लक्ष्मण माळी 
यांच्यासह विविध कंपनीचे वितरक, अधिकारी कर्मचारी, व ग्राहकांच्या हस्ते प्रतिमेचे  पूजन व दीपप्रज्वलन कार्यक्रमाची सुरुवात  करण्यात  आली.

त्यानंतर पोलीस पाटील लक्ष्मण माळी यांची पाच वर्षाची चिमुकली राजनंदिनी  व लहान मुले यांना एका बंद खोक्यातील लकी ड्रॉ चे कुपन काढून विजेत्या ग्राहकांची सोडत काढण्यात आली. या सोडतीत  प्रथम भाग्यवान एच.एफ. डिलक्स मोटारसायकल  विजेते  ठरले अरळी  (खुर्द) चे राहुल गायकवाड द्वितीय वाशिंग मशीन भाग्यवान विजेत्या ठरल्या शुभांगी कदम (धाराशिव), तृतीय भाग्यवान एल.ई.डी. टिव्ही  विजेते ठरले सागर पारधे (मंगरूळ), चतुर्थ  गीजर भाग्यवान विजेते ठरले राजेश तळवडे (खडकी), पाचवे मिक्सर भाग्यवान विजेते ठरले संदीप धनगर (कोरेवाडी) यासह प्रोत्साहनपर आकर्षक 10  बक्षिसेही उपस्थित मान्यवरांच्या  हस्ते देण्यात आली.यावेळी भाग्यवान विजेत्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पत्रकार दिनेश सलगरे व पत्रकार चांदसाहेब शेख यांनी तर आभार लक्ष्मण माळी यांनी मानले. यावेळी परिसरातील 30 ते 40 गावातील ग्राहक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

मोटारसायकल बक्षिस मिळाल्याचा आनंद..
मला प्रथम क्रमांकाची मोटारसायकल बक्षीस लागल्याचा फोन आला. त्यावेळी प्रथमतः माझा विश्वासचं बसला नाही इथं आल्यानंतर मानसन्मानाने माझ्याकडे हिरो एच. एफ. मोटारसायकल सुपूर्द करण्यात आली. त्यावेळी मला खुप मोठा आनंद झाला. 
मोटारसायकल विजेते राहुल गायकवाड अरळी (खुर्द)

ताज्या  बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, तुळजापूर/काटी
9923005236


Post a Comment

0 Comments