तुळजापूर:-मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे पाटील गेल्या सहा दिवसांपासून आमरण उपोषणास बसले आहेत. त्यांची प्रकृती अतिशय खालावली आहे.मात्र शासन त्यांच्याकडे अजूनही गांभीर्याने लक्ष देत नाही. ही बाब गंभीर असून त्यांच्या समर्थनार्थ तुळजापूर येथील तेजस सतीश बोबडे यांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ मागील चार दिवसांपासून आमरण उपोषण सुरु केले आहे.
आज त्यांच्या उपोषणस्थळी पत्रकार उमाजी गायकवाड, राहुल जाधव यांनी भेट देऊन समर्थन दिले. यावेळी छावा संघटनेचे व मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते महेश गवळी यांच्यासह मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments