Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

अक्षय बिराजदारने महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवेत मिळविले यश

मुरूम/प्रतिनिधी 
अक्षय दिनकर बिराजदारने एप्रिल २०२३ मध्ये झालेल्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा श्रेणी एक मध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. त्यांची सहाय्यक अभियंता श्रेणी-१ या पदावर जलसंपदा विभागात (राजपत्रित अधिकारी) म्हणून  निवड झाली आहे. त्यांना चांगले शिक्षण मिळावे या उद्देशाने पालकांनी उस्मानाबाद (धाराशिव) येथील निवासी तेरणा पब्लिक स्कूलमध्ये वयाच्या पाचव्या वर्षी केजीमध्ये प्रवेश दिला होता. तो बालपणापासूनच तल्लक बुद्धिमत्तेचा असल्याने त्यांनी सुरुवातपासूनच विशेष प्राविण्य मिळवित राहिला. 

दरम्यान अक्षयचे आई-वडील मुरूममध्ये स्थायिक होते. मूळ सारणी, ता. औसा येथील बिराजदार कुटूंबियांनी त्यावेळी स्वतःचे काळीज घट ठेऊन अक्षयच्या भविष्याचे स्वप्न पाहून हा निर्णय घेतला होता. काहीतरी चांगले साध्य करायचे असेल तर थोडा त्याग करावाच लागतो. बालपणी प्रत्येक बाळाला आई-वडिलांची खूप गरज असते पण हा त्याग परिवाराने सोसला. दिवाळी व उन्हाळा सुट्टी लेकऱ्यांच्या दृष्टीने खूप महत्वाची व आनंदाची असते. या उत्सवादरम्यान खऱ्या अर्थाने अनेकांच्या गाठीभेटी होतात. अक्षयचे संपूर्ण बालपण तेरणा पब्लिक स्कूलमध्ये गेले. त्यानंतर बिराजदार कुटुंबीयांनी मुलाच्या पुढील शिक्षणासाठी लातूर येथे घर केले. अक्षयने बारावीपर्यंतचे शिक्षण डॉ. चंद्रभानु सोनवणे कनिष्ठ महाविद्यालयातून जिद्दीने पूर्ण करून विशेष प्रविण्य मिळविले होते. इंजिअरिंगचे शिक्षण पुणे येथील सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीरिंग पदवी प्राप्त करत असताना विविध स्पर्धा परीक्षांची तयारी झालू होती. याकाळात अक्षयने महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षेसाठी अहोरात्र अथक परिश्रम घेऊन जिद्दीने यश मिळविले. त्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अभ्यास करणे, आई-वडिलांच्या कर्तुत्वाची जाणीव ठेवून तीन वर्षाच्या मेहनतीनंतर अक्षयला महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवेमध्ये यश मिळाले. त्याने घेतलेल्या कष्टाला फळ मिळाले. कुंटूब उच्चशिक्षित असल्याने अक्षयने घराण्याचे व  परिवाराचे नाव रोशन केल्याचे सर्वदूर कौतुक केले जात आहे. आपल्या आई-वडिलांनी आपल्याला बाहेर खास आपले स्वप्न पूर्ण व्हावेत या ध्येयाची जाणीव ठेवून अक्षयने वर्ग-१ चे पद मिळवून आयुष्याचे सोने करून दाखविले आहे. हे सर्व करताना त्यांच्या आई-वडिलांचे कष्ट याची कल्पना करणे कठीण आहे.  मुलं घडतात त्यांना घडवावे लागतं. मुलांकडे अधिक लक्ष देवून अभ्यासाला सातत्याने प्रवृत्त करणे, पाहटे उठवणे, त्यांना काय हवे ते वेळेवर करून देणे याकामामध्ये अक्षयची आई सौ. अनिता बिराजदार कुठेच कमी पडल्या नाहीत. याचे एक उत्तम उदाहरणच म्हणावे लागेल. अनेक अडचणीवर मात करत, नाती-गोती सांभाळून त्यांनी मुलाला घडविले. अक्षयला हे यश सहजासहजी मिळालेले नाही. पण अक्षयचा स्वत: वर प्रचंड आत्मविश्वास होता की, मी हे करून दाखवेन आणि या जिद्दीने त्याने करून दाखविले. 

अक्षयची छोटी बहीण श्रेया बिराजदार यादेखील मुंबई येथील  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात द्वितीय वर्षामध्ये शिकत आहेत. मुरूम येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ. दिनकर बिराजदार यांचे ते सुपुत्र आहेत. अक्षयच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. त्याच्या पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा...!    

आईच्या प्रेरणेतूनच स्पर्धा परीक्षांकडे वळलो
माझी आई खूप कष्टाळू आहे, मी अधिकारी व्हावे अशी तिची मनापासून इच्छा होती. आईच्या प्रेरणेतूनच मी जलसंपदा विभागात येण्याचा निर्णय घेतला. आई-वडिलांनी मला लहानपणापासून शिक्षणासाठी बाहेर ठेवल्याने माझी जबाबदारी अधिक वाढली होती. कुठलाही क्लास न लावता सेल्फ स्टडी केली आणि यश पदरात पडले. कोविडच्या काळात आणि कोविडनंतर ही मी माझ्या ध्येयापासून यतकींची देखील दूर राहिलो नाही. मी सहाय्यक अभियंता म्हणून सेवेत रुजू झाल्यानंतर माझ्या इंजिनिअरींगच्या शिक्षणाचा  उपयोग समाजाच्या कल्याणासाठी करेन.
-अक्षय दिनकर बिराजदार मुरूम, ता. उमरगा

Post a Comment

0 Comments