Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सेवा निवृत्त आयएएस अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांची तुळजापूर शुगर प्रायव्हेट लिमिटेड कारखान्यास सदिच्छा भेट

काटी/उमाजी  गायकवाड 
भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा मराठवाडा विभाग सहसमन्वयक ॲड.अनिल काळे यांच्या तुळजापूर तालुक्यातील  काटी येथील काटी-धामणगाव रोडवरील तुळजापूर शुगर प्रायव्हेट लिमिटेड या गुळ पावडर कारखान्यास मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण सिंह परदेशी यांनी शुक्रवार दि.16 रोजी सदिच्छा भेट देऊन  कारखान्यातील मशिनरी, गुळ पावडर निर्मिती प्रक्रिया, कारखान्याची गाळप क्षमता आदींबाबत कारखान्याविषयी माहिती जाणून घेत तुळजापूर शुगर गुळ पावडर कारखान्याचे काम अंतिम टप्प्यात आल्याबद्दल समाधान करून शुभेच्छा दिल्या.

प्रारंभी कारखान्याचे चेअरमन ॲड. अनिल काळे, कारखान्याचे संचालक आदित्य काळे, ऋषी वडगावकर यांनी मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करुन स्वागत केले.



ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236

Post a Comment

0 Comments