Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तुळजापूर -नळदुर्ग रस्त्यावर तीर्थ (बुद्रुक) मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको, दोन तास वाहतूक विस्कळीत

तुळजापूर:- मराठा आरक्षणासाठी अंबड  तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मराठा  योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या  समर्थनार्थ, सगेसोयरे अधिसूचनेचा कायदा करणेसाठी आणि सध्या त्यांची ढासळलेली प्रकृती व मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत  तुळजापूर तालुक्यातील तीर्थ (बुद्रुक), तीर्थ (खुर्द) व बिजनवाडी  या तीन  गावातील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने शनिवारी दि. 17 रोजी  सकाळी 9 ते 11 या कालावधीत नळदुर्ग - तुळजापूर रस्त्यावरील तीर्थ बुद्रुक येथील रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. सुमारे  दोन तास चाललेल्या या रस्ता रोको आंदाेलनामुळे नळदुर्ग -तुळजापर या दाेन्ही बाजूने जवळपास पाच किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने चक्काजाम  झाले होते. यावेळी मराठा बांधवांच्या वतीने शासनाचा निषेध करण्यात आला. या आंदोलनात महिलांचाही सहभाग लक्षणीय होता.


या आंदोलना दरम्यान आंदोलकांनी एक मराठा, लाख मराठा, मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, जय जिजाऊ  जय शिवराय, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणांनी  तीर्थ बुद्रुक परिसर दणाणून गेला होता. काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तुळजापूर पोलीसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

सकल मराठा समाजाच्या वतीने तब्बल  दोन तासानंतर तहसीलदार अरविंद कोळंबे यांचेकडे लवकरात लवकर मनोज जरांगे पाटील यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यात यावी असे निवेदन देऊन आंदोलन शांततेत स्थगित केले.

यावेळी तीर्थ (बुद्रुक), तीर्थ (खुर्द) व बिजनवाडी येथील मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा.....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, तुळजापूर/काटी
9923005236

Post a Comment

0 Comments