Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

बालाजी अमाईन्सच्यावतीने सी.एस.आर.अंर्तगत दहा प्राथमिक शाळेतील 1200 विदयार्थ्यांना गंमत ग्यान ॲक्टीव्हिटी बुक पुस्तकांची भेट

काटी/उमाजी गायकवाड
सोलापूर जिल्हयातील सहा शाळा व धाराशिव जिल्हयातील 4 शाळांतील 1200 विदर्थाना गंमत ग्यान ॲक्टिव्हिटी बुक वाटप शनिवार दि 17 रोजी बालाजी अमाईन्सच्या होटगीरोड येथील कार्यालयात बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री. डी राम रेड्डी  यांचे हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी मार्गदर्शन करताना बालाजी अमाईन्स व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांनी गंमत ग्यान पुस्तकांमुळे मुलांचा वेळ मोबाईलवर कमी होईल मुले ह्या पुस्तकामधील खेळांमध्ये रमतील या कारणाने त्यांच्या ज्ञानात भर पडेल तसेच कुठल्याही विषयावर निरिक्षण व त्या वस्तूकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन निर्माण व्हावा या करीता प्राथमिक शाळेतील मुलांना सध्या 1200 पुस्तकांचे वाटप करण्यात आले आहे. यास मिळणारा प्रतिसाद व शिक्षकांचा फिडबॅक पाहून पुढील काळात जास्तीत  जास्त पुस्तकांचे वाटप करण्याचा मनोदय  असल्याचे  त्यांनी यावेळी सांगितले.

प्रारंभी बालक पालक गंमत ग्यान पुस्तकाबद्दल विनायक जोशी यांनी माहीती व शिक्षकांना पुस्तकातील 24 ॲक्टिव्हीटी बद्दल माहीती दिली. फाऊंडेशनचे सिध्दाराम माशाळे यांनी हे पुस्तक मुलांना ज्ञान वाढीसाठी व मुलांना हसतखेळत कोडी सोडवत अभ्यास आहे हे पुस्तक उपलब्ध करून दिल्या बद्दल बालाजी अमाईन्सच्या सर्व संचालक मंडळ व बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक डी राम रेड्डी  यांचे आभार व्यक्त केले. 

या प्रसंगी जि प प्राथमिक शाळा मजरेवाडी येथील राचेटी यांनी व जि प प्राथमिक शाळा तामलवाडी येथील सहशिक्षका ज्ञानेश्वरी शिंदे यांनी ग्रामीण भागातील शाळा सहभागी केल्यामुळे याचा मुलांना फायदा होईल असे विचार व्यक्त केले.

या कार्यकमास बालाजी अमाईन्सचे सी. एस. आर विभागप्रमुख मल्लिनाथ बिराजदार उपस्थित होते. तसेच सर्व शिक्षक बाळासाहेब वाघ, प्रकाश राचेटी, सिध्दाराम मशाळे, गुणवंत चव्हाण (पिंपळा खुर्द), सहशिक्षिका ज्ञानेश्वरी शिंदे (तामलवाडी), वाघमारे (पिंपळा बु,) सहशिक्षिका प्रक्षाळे, सहशिक्षिका मोरेश्वर (शिंगडगाव), प्रतिमा जाधव (निंबगी), विविध शाळां मधील शिक्षक, विदयार्थी व बालाजी अमाईन्सचे दत्तप्रसाद सांजेकर उपस्थित होते .
सोलापूर जिल्हयातील या 6 शाळेना वाटप 
जि. प. प्राथमिक शाळा मजरेवाडी, जि. प. प्राथमिक शाळा सोरेगाव, जि. प. प्राथमिक शाळा अंबिकानगर बाळे, जि. प. प्राथमिक शाळा कवठेतांडा, जि.प. प्राथमिक शाळा शिंगडगाव, रमाबाई आंबेडकर आश्रमशाळा निंबर्गी या शाळेना वाटत झाले.
धाराशिव जिल्हयातील या 4 शाळेना वाटप
 जि. प. प्राथमिक शाळा तामलवाडी, जि. प. प्राथमिक शाळा पिंपळा (खुर्द), जि. प. प्राथमिक शाळा गोंधळवाडी,जि. प. प्राथमिक शाळा पिंपळा (बुद्रुक) या शाळेना वाटप झाले.

गंमत ग्यान फॅमिली ॲक्टिव्हीटी बुक  मुलांना विविध खेळांव्दारे २४ ॲक्टिव्हीटी मधून विविध विषयावर ज्ञान सहज व सोप्या पध्दतीने प्राथमिक शाळेतील मुलांना समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या मुळे मुलांची एकाग्रता निरिक्षण क्षमता सकारात्मकता संयम तसेच विविध विषया मधील सध्याचे ज्ञान या सर्व वाढीकरीता उपयोगी असे पुस्तक आहे.


ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा...
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236

Post a Comment

0 Comments