Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

भाजपचे जिल्हा अध्यक्ष संताजी चालुक्य यांचा वाढदिवस विविध सामाजिक कार्यक्रमाने साजरा

तुळजापूर:- भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष, किल्लारी शेतकरी सहकारी साखर कारखाना माजी चेअरमन तथा भाजपचे सर्वांना  सोबत घेऊन जाणारे ‌अष्टपैलू नेतृत्व  संताजीराव चालुक्य पाटील यांचा वाढदिवस  विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात  आला.

भाजपचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप  कार्यकर्त्यांच्या वतीने शनिवार  दि.18 रोजी आई तुळजाभवानीस महाआरती करुन  त्यांना उदंड आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर विविध मान्यवरांच्या उपस्थितीत तुळजाभवानी मंदिर महाद्वार समोर गरजवंत महिलांना साड्या वाटप करण्यात आल्या. तसेच येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. 

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सचिन (भैय्या) पाटील,भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य गुलचंद (भाऊ) व्यवहारे, भाजप जेष्ठ नेते नागेश नाईक,महिला प्रदेश कार्यकारणी सदस्य मीनाताई सोमाजी,उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ मलबा,  युवा मोर्चा तालुकाध्यक्ष आनंद कंदले, विकास मलबा,शहराध्यक्ष शांताराम पेंदे, अमर हंगरगेकर इंद्रजीत साळुंके, प्रसाद पानपुडे, रामभाऊ चोपदार,बाळासाहेब भोसले, दिनेश बागल, बाबा श्रीनामे,महादेव रोचकरी,धैर्यशील दरेकर आदींसह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, तुळजापूर
9923005236

Post a Comment

0 Comments