Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

शिवजयंती निमित्त जिजाऊ ब्रिगेड व मराठा सेवा संघाच्या वतीने खेळाचे साहित्य व फळे वाटप करून जयंती साजरा

येणेगूर/प्रतिनिधी 
सोमवार दि.19 रोजी उमरगा येथे बहुजन हिताय विद्यार्थी वस्तीग्रहात छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त‌‌ जिजाऊ ब्रिगेडच्या रेखाताई पवार यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना  शिवरायांच्या जीवनशैली व त्यांच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकत असताना त्या म्हणाल्या की, महाराष्ट्राचे  आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हेच आपले खरे दैवत असून प्रत्येकांनी त्यांची आपल्या देव्हाऱ्यात पुजा केली पाहिजे.

जिजाऊंच्या  पोटी जन्मालेला हा तेजस्वी प्रखर स्वाभिमानी प्रकाश महाराष्ट्रासह संबंध देशाला गुलामीतून मुक्त करीत उंच आकाशाच्या दिशेने गुलामीच्या अंधार चिरीत होता व प्रत्येक क्षितिजावर भगवा फडकवीत होता आणि सर्व प्राणिमात्र एक असून कुणालाही दुसऱ्यावर अत्याचार करता येणार नाहीत आणि अशी डरकाळी फोडली की जर कुणी असे करील तर गाठ भवानी तलवारीशी आहे. मुलांनो आजही आपल्याला ही तलवार  ललकारीत आहे. महाराजांचे बुद्धिमानता, दुरदृष्टेपणा  चाणाक्षपणा कठोर परिश्रम, कुशल संघटक आणि गनिमी काव्याने काम करण्याची हातोटी हे गुण तुम्ही आत्मसात केले पाहिजेत, आज आपणास पुन्हा एकसंघ रयतेचा आदर्श महाराष्ट्र घडविण्यासाठी तुमच्यातील शिवबा मशालीसारखा तेवत ठेवायला हवा आहे.

याप्रसंगी संस्कार पवार 8 वी व लक्ष्मण दुधभाते या विद्यार्थ्यांची भाषणे झाली. कार्यक्रमाची सुरुवात भ. बुद्ध, डॉ बाबासाहेब आंबेडकर छ. शिवाजी महाराज यांचे प्रतिमांचे पूजन करून झाली . 

यावेळी मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड,जिजाऊ ब्रिगेडचे परिसरातील प्रमुख कार्यकर्ते व कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने सामाजिक कार्यकर्ते भूमिपुत्र वाघ, संत तुकाराम महाराज साहित्य परिषद लातूरचे अध्यक्ष डॉ हणमंत पवार, श्रीमती रेखाताई पवार,समाज सेवक मनोज हावळे, ज्योती राजपूत,सतीश पवार, साधनाताई पवार,राऊबाई भोसले, सत्यवती इंगळे,मंजुषा चव्हाण,देशमुखताई , सुलभाताई जाधव,कल्पना कलशेट्टी,उषाताई पवार, राउताई पाटील, भारत कापसे, सुधीर माने,अमर कोथिंबीरे आदींची उपस्थिती होती. 

प्रास्ताविक ध. प्रज्ञाजीत यांनी तर सूत्रसंचालन वसंत पासेमे यांनी आणि आभार वसतीगृहाचा विद्यार्थी लक्ष्मण दूधभाते यांनी केले याप्रसंगी वसतिगृहाचे कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments