Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

मोर्डा येथे शिवजयंती उत्साहात साजरी

तुळजापूर/प्रतिनिधी 
 तुळजापूर तालुक्यातील मोर्डा  येथे ग्रामस्थांच्या वतीने सोमवार दि.19 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता येथील सांस्कृतिक सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी येथील सांस्कृतिक सभागृह परिसरात छत्रपती शिवाजी महाराज संदर्भातील गीतांनी व पोवाड्यांमधून उलगडणारी शिवाजी महाराजांची शौर्यगाथा अन् भगवे ध्वज हातात घेऊन उत्साहात सहभागी झालेले आबालवृद्ध छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा आदर,प्रेम आणि अभिमान व्यक्त करण्यासाठी शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी केली.

प्रारंभी पोलीस पाटील किशोर सुरवसे व राहुल जाधव यांनी शिवप्रतिमेचे पूजन करूनच मानवंदना दिली. यावेळी "जय भवानी जय शिवाजी", "छत्रपती शिवाजी महाराज की जय" च्या  घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

येथील वैविध्यपूर्ण वातावरणामुळे 
जणू हिंदवी स्वराज्याचे प्रतिक असलेल्या भगव्या रंगाने व्यापल्याचे चित्र  पहावयास मिळाले.

यावेळी सरपंच ज्ञानेश्वर पांडागळे पोलीस पाटील किशोर सुरवसे, दत्ता जाधव, पांडुरंग सुरवसे, राहुल जाधव, रमेश  सुरवसे, प्रथमेश सुरवसे, नवनाथ जाधव, अनिरुद्ध सुरवसे, चंद्रकांत सुरवसे, रामेश्वर सुळे,करण सुरवसे,सुमंत कोळेकर,अक्षय  सुरवसे, प्रभाकर जाधव आदी शिवभक्त उपस्थित होते.


ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, तुळजापूर
9923005236

Post a Comment

0 Comments