Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

कुंभारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील कुंभारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

प्रारंभी पोलीस पाटील विठ्ठल वडणे व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष खंडु कुंभार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहशिक्षक पोपट सुरवसे यांनी करुन विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल माहिती देताना त्यांचे विचार, आचार, कर्तृत्व आत्मसात करण्याची  गरज असल्याचे सांगितले.

यावेळी इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांविषयी आपली भाषणे व पोवाडे सादर केली. यामध्ये स्वराजंली  तांबे, दिशा दिलपाक, इरम  पटेल, समृध्दी तांबे, हिंदवी वडणे,श्रेया लोकरे, तेजस्विनी तांबे यांनी सहभाग घेतला होता. याला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात व शिवाजी महाराजांच्या जयघोषात प्रतिसाद दिला.

शिवरायांचे कर्तृत्वाचे चिंतन विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे
--मुख्याध्यापक इर्शाद शेख 

यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित करताना शाळेचे मुख्याध्यापक इर्शाद शेख म्हणाले की, शिवरायांच्या लहानपणापासून स्वराज्य निर्मितीच्या काळापर्यंत, युध्दाच्या काळात जिजाऊ माँ साहेब शिवरायांच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या होत्या असे सांगून जिजाऊंनी केलेल्या संस्कारांमुळेच शिवाजी राजे घडले. आदिलशाही, निजामशाही व कुतूबशाही यांच्या अन्याय व अत्याचाराने त्रस्त अशा समाजात आत्मविश्वास निर्माण करीत अत्यंत कठीण परिस्थिती जिजाऊंनी शिवरायांचा राज्याभिषेक करून स्रियांचा सन्मान असलेले न्याय व कायद्याचे स्वराज्य निर्माण केले, असेही ते म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, वर्तमान परिस्थितीत युवकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी जिजाऊ माँसाहेबांनी स्वराज्य निर्मितीसाठी दिलेले सर्वोच्च समर्पण व शिवरायांचे कर्तृत्व याचे चिंतन विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी पोलीस पाटील विठ्ठल वडणे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष खंडु कुंभार, मुख्याध्यापक  इर्शाद शेख, सहशिक्षक पोपट सुरवसे, सहशिक्षिका सौ.वासंती गायकवाड आदींसह विद्यार्थी, विद्यार्थींनी,ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments