Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

विठाई हॉस्पिटल तुळजापूर येथे शिवजयंती साजरी;सामाजिक दायित्वाचा एक अनोखा संकल्प; रुग्णांसाठी उपचार जाहीर

तुळजापूर/प्रतिनिधी
अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची 393वी जयंतीचे औचित्य साधून तुळजापूर  येथील डॉ. श्रीराम नरवडे यांच्या विठाई हॉस्पिटलमध्ये एक अनोखा संकल्प घेऊन साजरी करण्यात आली.

विठाई हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ श्रीराम नरवडे (एमडी) यांनी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या सेवाभावातून छत्रपती  शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सोमवार दि.19 पासून विठाई हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल असलेल्या व उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी खालील सवलती जाहीर केल्या आहेत.

विठाई हॉस्पिटल जाहीर झालेल्या या आहेत सवलती 
1)आजी-माजी सैनिक 50 टक्के सवलत, 2)माझी एसटी कर्मचारी 20 टक्के सवलत, 3)सेवेत असणारे एसटी कर्मचारी 20 टक्के सवलत, 4)दिव्यांग लोकांसाठी 20 टक्के सवलत, 5)आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब 20 टक्के सवलत,6) तसेच गरजू रुग्णांना मोफत जेवण अशा सवलती जाहीर केल्या आहेत.

प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आई जगदंबा आणि छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करुन  अभिवादन करण्यात आले.

यावेळी शहरातील युवा नेते विनोद भैया गंगणे ,माजी नगरसेवक अमर भैया मगर, पंडितराव जगदाळे, औदुंबर कदम,भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आनंद दादा कंदले, सचिन अमृतराव,डॉ श्रीराम नरवडे, डॉ प्रशांत मोटे,डॉ विकास शिरसागर,श्री प्रशांत संकपाळ, छगनराव जगताप, प्रवीण मुळे, पवन जगताप,गणेश खानवटे, अझीझ सय्यद, साधू बोबडे,पराग जगताप, लालू शेख, तुळजापूर आगार प्रमुख राम शिंदे, एसटी कर्मचारी राजेंद्र जगताप,दत्तात्रय नरवडे,राम खराडे, विपिन नरवडे, दिव्यांग लोकांसाठी मदत करणारे महादेव चोपदार श्री मुळे व विठाई हॉस्पिटलचे सर्व स्टाफ व कर्मचारी उपस्थित होते.


ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा.....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, तुळजापूर
9923005236

Post a Comment

0 Comments