Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी ग्रामपंचायतच्या वतीने शिवजयंतीच्या शुभ मुहूर्तावर विविध विकासकामांचे उद्धघाटन

काटी/उमाजी  गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील काटी ग्रामपंचायतच्या वतीने सोमवार दि.19 रोजी सकाळी निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, जाणता राजा, विश्ववंद्य राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज  यांच्या जयंतीचे औचित्य साधून विविध मान्यवर व ग्रामस्थांच्या उपस्थितीत विविध 15 वा वित्त आयोग, पंचायत  समिती व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आलेल्या 1 कोटी 60 लक्ष रुपयांच्या विकासकामांचे उद्धघाटन व भूमिपूजन सोहळा  मोठ्या दिमाखात पार पडला.

या विकास कामांमध्ये प्रामुख्याने
15 वा वित्त आयोग 
15 वा वित्त आयोगाच्या  माध्यमातून करण्यात येणाऱ्या 16 लाखांच्या निधीतून जल शुध्दीकरण पाणी पुरवठा दुरुस्ती, 7 लाखांचे येथील जिल्हा परिषद केंद्रीय कन्या प्रश्नाला शाळा दुरुस्ती, अडीच लाखांच्या निधीतून येथील अंगणवाडी आय.एस.ओ. करणे, 3 लाखांच्या निधीतून येथील स्वामी समर्थ मंदिर ते दत्ता अलवटे घर भूमिगत गटार योजना राबविणे, दुसऱ्या 3 लाखांच्या निधीतून 
अतुल सराफ ते गौरव राऊत घर भूमिगत गटार योजना, 3 लाखांच्या निधीतून बस स्टँड ते सोमनाथ जाधव (कैकाडी) भूमिगत गटार योजना, 4 लाखांच्या निधीतून रोहिदास नगर सिमेंट रस्ता, आणि 2 लाखांच्या निधीतून येथील भीमनगर स्मशानभूमी  पर्यंतचा सिमेंट रस्त्यांचा समावेश आहे.

पंचायत समिती स्तर
पंचायत समिती अंतर्गत 4 लाखांचे अंबाबाई मंदिर ते गणेश मुस्मुसे घर भूमिगत गटार योजना, 3 लाखांमधून गावातील थोरबोले, इनामदार चौक व धनगर गल्लीतील तीन बोअरवेलमध्ये विद्युत मोटार टाकणे, 2 लाखांच्या निधीतून सातपुते बोळामध्ये गाव अंतर्गत सिमेंट रस्ता, 3 लाखांच्या निधीतून कादर शेख ते बबलू काझी भूमिगत गटार योजना, अडीच लाख निधीतून धनगर स्मशानभूमी पर्यंतचा सिमेंट रस्ता 

दलित वस्ती जिल्हा परिषद स्तर
दलीत वस्ती जि.प.स्तरातून 
रोहिदास नगर सिमेंट रस्ता 5 लाख, साठे नगर सिमेंट रस्ता 5 लाख, जिल्हा परिषद प्रश्नाला शाळा दुरुस्ती 10 लाख, ओढा (किट वेअर) दुरुस्ती 10 लाख, 
रामलिंग घडमोडे ते प्रवीण साळुंके सिमेंट रस्ता 10 लाख, संतोष फंड ते अशोक हंगरकर सिमेंट रस्ता 10 लाख या कामांचा समावेश आहे.या विकासकामांसाठी ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन माजी चेअरमन सयाजीराव देशमुख यांनी केले आहे.

हा विकासाचा रथ असाच पुढे नेणार 
--सरपंच पती सुजित हंगरगेकर 
"गावचे नागरिक हेच आपले कुटुंब व केंद्र बिंदू समजून गावचा खऱ्या अर्थाने विकास होईल या दृष्टीने येथील विकास कामाला  प्राधान्य देणार असून काटी गावांमध्ये विकासकामे झाली पाहिजेत हि भावना  डोळ्यासमोर ठेवून हा विकासाचा रथ गतीने पुढे नेण्याचा माझा संकल्प राहील आणि निवडणूक काळात दिलेला शब्द पाळणार अशी ग्वाही देतो.
--सरपंच पती तथा सरपंच  परिषदेतचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर, काटी ता. तुळजापूर 

सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर 

यावेळी  माजी चेअरमन सयाजीराव देशमुख लोकनियुक्त सरपंच सौ.आशा सुजित हंगरगेकर, उपसरपंच जुबेर शेख, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश सोनवणे,चंद्रकांत काटे,भैरीनात काळे,रामहरी लोंढे,अनिल बनसोडे, अमोल गावडे, बाळासाहेब शिंदे,संपत पंखे , ब्रह्मदेव भाले,अनिल गुंड,मंजूर कुरेशी,शुभांगी काटे, प्रदीप साळुंके, प्रकाश गाटे, विकास हंगरकर, शामराव आगलावे, शिवलिंग घाणे,कालू कुरेशी, कय्युंम कुरेशी,अभिमान बामनकर,आबा रोडे,सत्यजीत देशमुख,भोलेनाथ बनसोडे, शाम चव्हाण, आयुब पठाण, कुबेर नारगुडे, प्रवीण विभुते,चंद्रकांत काळे, सागर आगलावे, आजम शेख,हमीद शेख, सत्यवान बोराडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी उपसरपंच जुबेर शेख यांनी उपस्थितांचे आभार मानले.


ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी+
9923005236

Post a Comment

0 Comments