येणेगूर/प्रतिनिधी
उमरगा तालुक्यातील येणेगुर येथील हायटेक इंग्लिश स्कूल मध्ये ३९४ वा शिवजयंती उत्साहात साजरा करण्यात आली.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापिका सरस्वती मोरे यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विध्यार्थ्यामधून श्रेया सुरवसे, ज्ञानराज जाधव, श्रवणी कुरुम, प्रज्ञेश भोसले, हर्ष घोरपडे, महेश्वरी टिकंबरे,भक्ती पाटील,यशवंती सुरवसे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात भाषणे केली.
यावेळी सहशिक्षका ढोबळे आपले विचार मांडताना म्हणाल्या की, छञपती शिवरायांचा आदर्श ठेवून त्याप्रमाणे कृती करणे हिच खरी शिवजयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराज आई जिजाऊंना नतमस्तक होऊनच आपल्या कामाची सुरुवात करायचे. मॉ साहेब जिजाऊ यांच्या मार्गदर्शनामुळे छत्रपतींच्या मनामध्ये स्रियांविषयी आदर केला पाहिजे. तसेच यावेळी त्यांनी त्यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला.
त्यानंतर इयत्ता 7वी च्या मुलींनी शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त उत्कृष्ट असा नृत्य सादर केले. या कार्यक्रमाची सूत्रसंचलन ढोबळे यांनी केले. ही कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, तुळजापूर
9923005236
0 Comments