Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा, यश मिळाल्याशिवाय राहणार नाही- प्रा.सत्यवान सूर्यवंशी

              
 मुरुम/प्रतिनिधी
दहावी-बारावी परीक्षेची भीती अशी घालवावी परीक्षा म्हटलं की थोडी भीती वाटणे, ताणतणाव येणे स्वाभाविक परंतु वेळेचे व्यवस्थापन, नियोजनबद्ध अभ्यास व तब्येतीची काळजी घेऊन आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा, यश  मिळाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन लातूरचे प्रा. सत्यवान सूर्यवंशी यांनी केले. रोटरी क्लब मुरूम सिटी व प्रतिभा निकेतन विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भीती मुक्त परीक्षा आणि ताणतणावाचे व्यवस्थापन या विषयावर सोमवारी (ता. १२) रोजी प्रमुख व्याख्याते म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका महानंदा रोडगे होत्या.

यावेळी रोटरीचे अध्यक्ष कमलाकर मोटे, सचिव सुनिल राठोड, रोटरीचे माजी अध्यक्ष गोविंद पाटील, डॉ. नितीन डागा, डॉ. महेश मोटे, संतोष कांबळे, डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी, डॉ. रामलिंग पुराणे, प्रकाश रोडगे, शिवकुमार स्वामी, उपमुख्याध्यापक उल्हास घुरघुरे, परिवेक्षक विवेकानंद पडसाळगे,माजी मुख्याध्यापक गुरुनाथ शेळके, इरफान मुजावर आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी दिवंगत माधवराव (काका) पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अध्यक्षीय समारोप कमलाकर मोटे यांनी केला.

पुढे बोलताना प्रा. सूर्यवंशी म्हणाले की, तुम्ही वर्षभर अभ्यास केलात, अनेक सराव प्रश्नपत्रिका सोडविलात, कष्ट घेतलात. परीक्षेच्या आधी त्या-त्या विषयाची किमान एक वेळा उजळणी केलात, वेळ वाया न घालवता अभ्यासाची उजळणी करा, केवळ रेडिमेड नोट्स न वाचता तुमच्या क्रमिक पुस्तकांचा सखोल अभ्यास करा. परीक्षेच्या वेळी सोबत हॉलतिकीट, लेखन साहित्य घ्यायला विसरू नका, मोबाईल व इलेक्ट्रॉनिक घडयाळ परीक्षा कक्षात नेऊ नका आदी बाबींची काळजी घेऊन परीक्षेला आत्मविश्वास व जिद्दीने सामोरे जा असे ते शेवटी म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. नितीन डागा यांनी केले. पाहुण्याचा परिचय प्रा. डॉ. महेश मोटे यांनी करून दिला. सूत्रसंचालन उल्हास घुरघुरे तर आभार संतोष कांबळे यांनी मानले. शहरातील प्रतिभा निकेतन विद्यालय, इंग्लिश स्कूल, झाकीर हुसेन उर्दू शाळा, ज्ञानदान विद्यालय, जिल्हा परिषद कन्या प्रशाला, जिल्हा परिषद शाळा आदी शाळेतील विद्यार्थ्यांसह शिक्षक वृंद उपस्थित होते.                      

मुरूम, ता. उमरगा येथील प्रतिभा निकेतन विद्यालयात आयोजित व्याख्यानाप्रसंगी प्रा. सत्यवान सूर्यवंशी बोलताना कमलाकर मोटे, गोविंद पाटील, नितीन डागा, महानंदा रोडगे, सुनिल राठोड व अन्य.

Post a Comment

0 Comments