मुरूम/प्रतिनिधी
उमरगा तालुक्यातील मुरुम येथील प्रतिभा निकेतन विद्यालयात मंगळवारी (ता.१३) रोजी स्वयंशासन दिन उत्साहात साजरा झाला. यावेळी दहावीचे विद्यार्थी शिक्षक बनून विद्यार्थ्यांना शालेय धडे दिले. नववीच्या विद्यार्थ्यांकडून दहावीच्या विद्यार्थ्यांना यावेळी निरोप देण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका महानंदा रोडगे होत्या.
यावेळी उपमुख्याध्यापक उल्हास घुरघुरे, दिलीप स्वामी, चंद्रमप्पा कंटे, विवेकानंद परसाळगे, प्रा. डॉ. सुजित मठकरी, संतोष घुगे आदींची उपस्थिती होती. एक दिवसीय शालेय मुख्याध्यापक म्हणून अर्णव मठकरी, उपमुख्याध्यापक आकाश विभूते, समृद्धी घुगे, पर्यवेक्षक सुरेश जाधव, साक्षी कारभारी, सखुबाई शिंदे, श्रद्धा नागुरे आदींची उपस्थिती होती.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिवंगत माधवराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. शिक्षकांची भूमिका, कार्य व जबाबदारीची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी स्वयंशासन दिनाचे आयोजन केले जाते. या दिवसी दहावीच्या विद्यार्थ्यांनी एकदिवसीय शालेय शिक्षकांची जबाबदारी स्वीकारली. विद्यालयात सकाळपासूनच विद्यार्थ्यांनी शाळेची धुरा संभाळत दहावीच्या विद्यार्थ्यांनी विविध विषय शिक्षकांची भूमिका निभावत विद्यार्थ्यांना शालेय धडे दिले. यामध्ये मुलींचा सहभाग मोठा होता.
या प्रसंगी वैष्णवी हिरमुखे, श्रष्टी गुरव, काव्या टिकांबरे, मोनिका चव्हाण, सुप्रिया तेलीकूणे, शितल चव्हाण, कांचन राठोड, प्रज्ञा घोडके, प्रणिता सगर आदींनी मनोगत व्यक्त करताना भावनिक झाल्या होत्या. आपल्या शालेय जीवनातील चांगल्या-वाईट प्रसंगाच्या आठवणी काढून आपल्या गुरुवर्यानी दिलेले शैक्षणिक धडे गिरवत जुन्या आठवणीला उजाळा देवून निरोप घेत असताना त्यांचे कंठ दाटून आले. अनेक विद्यार्थिनीनी मराठी-हिंदी भाषेत मनोगत व्यक्त केले तर काहींनी कवितेतून शाळेबद्दल आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. यावेळी इयत्ता १० (अ) च्या विद्यार्थ्यांनी एक डझन खुर्च्या भेट तर दहावी (ब, क, ड, इ) वर्गाच्या विद्यार्थ्यांनी कपाट व टेबलासाठी रक्कम दिली. यावेळी उपमुख्याध्यापक घुरघुरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका रोडगे यांनी अध्यक्षीय समारोप केला.एस. एस. कांबळे, आय. जे. मुजावर, एस. एस. सूर्यवंशी, के. पी. जाधव सह शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी स्वयंशासन दिन यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. प्रास्ताविक रेणुका वाकळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायत्री इंगळे व पल्लवी शिंदे तर आभार सोनाली गडकर यांनी मानले.
मुरुम, ता. उमरगा येथील प्रतिभा निकेतन विद्यालयात स्वयंशासन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना सृष्टी गुरव, मुख्याध्यापक अर्णव मठकरी, उपमुख्याध्यापक आकाश विभूते, समृद्धी घुगे, पर्यवेक्षक सुरेश जाधव सह मुख्याध्यापक व शिक्षक वृंद.
0 Comments