Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

प्रतिभा निकेतन विद्यालयाचा स्वयंशासन दिन उत्साहात साजरा

मुरुम/प्रतिनिधी 
उमरगा  तालुक्यातील भुसणी येथील प्रतिभा निकेतन विद्यालयाच्या इयत्ता दहावी विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन बुधवारी (ता. १४) रोजी प्रतिभा निकेतन विद्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. या स्वयंशासन दिनाचे मुख्याध्यापक प्रीतम गायकवाड, उपमुख्याध्यापक प्रेम सुरवसे, पर्यवेक्षिका साक्षी संगशेट्टे यांनी शाळेचे कामकाज पाहिले. रतन कडले, गांधी हिरेमठ, निकिता पाटील, लक्ष्मी जमादार, मनीषा गाडेकर, साक्षी पाताळे यांनी शिक्षकांची भूमिका निभावली.  

कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक तात्यासाहेब शिंदे म्हणाले की, आजच्या तरुणांनी चांगले संस्कार घेऊन जगणे महत्वाचे आहे. नितीमान व सुसंस्कृत पिढी निर्माण झाली पाहिजे. तरच देश बलशाही होईल. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहशिक्षक प्रेमनाथ आपचे, महेंद्र गायकवाड, मुजावर जमीर, संजीव सकपाळे, सोनाली काळे, शिवाजी कुंभार, दिगंबर पांचाळ आदींनी पुढाकार घेतला. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सानिया मुल्ला व संचिता पाटील तर आभार श्रुती बनसोडे यांनी मानले.                       

भुसणी, ता. उमरगा येथील प्रतिभा निकेतन विद्यालयाचा स्वयंशासन दिन साजरा करताना मुख्याध्यापक तात्यासाहेब शिंदे, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, स्वयंशासन दिनाचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक व शिक्षकवृंद.

Post a Comment

0 Comments