Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

कष्टकऱ्यांना माणूस म्हणून जगता यावे यासाठीच हमाल माथाडी-- राजकुमार घायाळ

मुरूम/प्रतिनिधी
उमरगा तालुक्यातील मुरुम येथील कृषी उत्पन्न बाजार समिती प्रांगणात रविवारी (ता.१८) रोजी हमाल माथाडी संघटनेचा मेळावा संपन्न झाला. 

याप्रसंगी बोलताना हमाल माथाडी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष राजकुमार घायाळ म्हणाले की, राज्यातील कष्टकरी माणसांना माणूस म्हणून जगता यावे, माणूस म्हणून त्यांच्याशी वर्तन करावे. यासाठीच हमाल माथाडी संघटना डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली कार्य करीत असल्याचे प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. 

यावेळी शिवाजी दूधभाते, गुलाब क्षीरसागर, नामदेव गायकवाड, सुरेश रणसुरे, चंद्रकांत गायकवाड, झुंबरबाई सितापुरे, सोजरबाई गायकवाड आदींची उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. 

 पुढे बोलताना घायाळ म्हणाले, या मुरूम शहरातून ३२ वर्षांपूर्वी संघटनेला एक कार्यकर्ता दिला होता ते पत्रकार तथा जिल्हा सेक्रेटरी हमाल माथाडी कै. शिवाजी जगताप यांच्या आठवणींना उजाळा दिला. अनेक संघटना व्यवसाय स्वरूपात कार्यरत आहेत मात्र हमाल माथाडी संघटना कष्टकरी लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी गेल्या सत्तर वर्षांपासून लढत असल्याचे त्यांनी सांगून हमाल मापाथीच्या विकासात्मक धोरणासाठी मार्गदर्शन केले. 

या कार्यक्रमासाठी संजय शेंडगे, राजेंद्र सुरवसे, अतिष इंगळे, सिद्राम हावळे, धोडींबा शिंदे, नरसिंग मंडले, संतोष सरवदे, शाम भोकले, जगन्नाथ देडे आदींनी पुढाकार घेतला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार किरण गायकवाड यांनी मानले.                  

मुरूम, ता. उमरगा येथील मार्केट कमिटी मध्ये आयोजित हमाल मापाथी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष राजकुमार घायाळ बोलताना शिवाजी दूधभाते, गुलाब क्षीरसागर, नामदेव गायकवाड, सुरेश रणसुरे व अन्य.

Post a Comment

0 Comments