मुरूम/प्रतिनिधी
उमरगा तालुक्यातील मुरूम येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ.रामलिंग काशिनाथ पुराणे यांना संजीवनी फाऊंडेशनच्या वतीने देण्यात येणारा "शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२४" जाहीर झाला आहे.
डॉ.पुराणे यांना सामाजिक कार्यातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. डॉ.पुराणे यांचे जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी पन्नासहून अधिक यशस्वी आंदोलने झाले आहेत. तालुका,जिल्हा,राज्य,राष्ट्रीय पातळीवर त्यांचे यशस्वी आंदोलने झाले आहेत. राज्यातील धाराशिव, पुणे,वर्धा,मुंबई येथील आझाद मैदान, दिल्ली येथील जंतरमंतर मैदानात त्यांचे यशस्वी आंदोलने झाले आहेत. बेरोजगार, कष्टकरी, शेतकरी, आरोग्यविषयक सह समाजातील सर्व घटकातील नागरिकांसाठी न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचा संघर्ष कायम चालू असतो.
उमरगा तालुक्यातील ग्रामीण भागातील मुरूम याठिकाणी एका सामान्य भूमिहीन शेतमजूर यांच्या घरी त्यांचा जन्म जरी झाला असून तळागाळातील सामान्य नागरिकांचे समस्यांचे त्यांना जाण आहे आणि त्याचेच रूपांतर एका आंदोलनकारी संघर्षात झाला. उमरगा तालुक्यातील शकेडो नागरिकांना रेशन कार्ड असून धान्य मिळत नव्हते, अनेक नागरिकाजवळ रेशनकार्ड नव्हते अशा जनसामान्यां नागरिकांसाठी त्यांनी लढा उभा करून त्यांना स्वखर्चाने शासन दरबारी पाठपुरावा करून धान्य व रेशन कार्ड मिळवून दिले. राज्यातील होमगार्ड समस्या विषयीचे त्यांचे आंदोलन राज्यात आणि दिल्ली येथे गाजले आहेत. आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून जीवन बिमा, त्यांची पदे, अपात्र होमगार्डना पूर्वरत कामावर रुजू करून घेतले असून त्यांचा ब्रिटिश कालीन कायद्यात बदल होण्यासाठी दिल्ली आणि मुंबई सरकार कडे पाठपुरावा चालू आहे. डॉ.पुराणे यांना आतापर्यंत सामाजिक कार्यातील डॉक्टरेट,समाजभूषण, कोरोना योद्धा, जननायक,समाजचिंतक, लोकतंत्र के प्रहरी अशा विविध पुरस्कराने गौरविण्यात आले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन संजीवनी फौंडेशनच्या वतीने त्यांना २०२४ चा "शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार" जाहीर करण्यात आल्याचे पत्र संस्थेचे चेअरमन डॉ. ज्ञानेश्वर सानप यांनी पत्राद्वारे कळविले आहे.
दि.०२ मार्च रोजी राज्याचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, विधान परिषद सदस्य आमदार सत्यजित तांबे,शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, खासदार सदाशिव लोखंडे, अकोले मतदार संघ आमदार किरण लहामटे,पद्मश्री महाराष्ट्र भूषण त्यात्याराव लहाने, काँग्रेस कमिटी महासचिव उत्कर्षताई रुपवते, संगमनेर नगर परिषद माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे,युवानेते विवेक कोल्हे, कृष्णराज महाडिक या मान्यवरांच्या उपस्थितीत मालपाणी हेल्थ क्लब संगमनेर याठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहे. मुरूम शहर व परिसरात त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन केले जात आहे.
0 Comments