Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

धुत्ता येथे शिवजयंती निमित्त आयोजित रक्तदान शिबिरात 25 हिंदू-मुस्लिम रक्तदात्यांचे रक्तदान; सामाजिक व धार्मिक एकतेचे दर्शन

धाराशिव:- धाराशिव तालुक्यातील धुत्ता येथील शंभूराजे प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंतीच्या निमित्ताने व शंभूराजे प्रतिष्ठानच्या स्थापनेला १० वर्ष पूर्ण झाल्याने रक्तदान शिबिराचे  आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात 25 हिंदू - मुस्लिम युवकांनी रक्तदान करुन सामाजिक आणि धार्मिक एकतेचा संदेश दिला.

शिवजयंतीनिमित्त राज्यात दरवर्षी शिवप्रेमींकडून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. परंतु धाराशिव  तालुक्यातील धुत्ता येथे 
येथील शंभूराजे प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती निमित्त आयोजित  रक्तदान शिबिरात मुस्लिम युवकांनी या सामाजिक कार्यात सहभाग नोंदवून रक्तदान केले. शिवजयंती निमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामुळे धुत्ता  येथे सामाजिक आणि धार्मिक एकतेचे दर्शन घडले असून नागरिकांकडून या मुस्लिम मावळ्यांचं कौतुक होत आहे. या रक्तदान शिबिरात लातूर ब्लड बॅंकेने  रक्त संकलन केले. तसेच 23 जणांची रक्तगट तपासणी करण्यात आली.

शंभू राजे प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती  निमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवून  शिवजयंती  साजरी केली करण्यात येते. याही वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तिचे पूजन करून येथील हिंदू-मुस्लिम युवकांनी एकत्र येत रक्तदान  शिबिराला सुरुवात करण्यात आली.

यामध्ये प्रामुख्याने शंभूराजे प्रतिष्ठानचे मार्गदर्शक व आधारस्तंभ शंभूराजे मस्के, अजित काटे, दत्ता पिंपरे,वैभव कदम,मोहन पिंपरे,महेश परिट, किशोर गायकवाड,सागर पिंपरे, गुणवंत घोडके,ओमप्रकाश मस्के, मंजूर शेख,अजर शेख, अनिस मासूलदार,अजय एकंडे, मोबिन शेख,सागर मोरे,प्रणित पिंपरे, लिंबराज पिंपरे,अलीम शेख, समीर शेख,दीपक मस्के,सुशांत मस्के,अक्षय मस्के आदी युवकांनी रक्तदान करून शिवजयंतीमध्ये सहभाग घेतला होता. 

हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी  शंभूराजे प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले होते.



ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, तुळजापूर/काटी
9923005236

Post a Comment

0 Comments