Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

माजी आमदार तथा प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी भाजपच्या वतीने तुळजाभवानीस महाअभिषेक व महाआरतीने तुळजाभवानीस साकडे

तुळजापूर:-  तुळजापूर येथील भारतीय जनता पार्टीच्या वतीने  बुधवार दि. 21 रोजी भाजपचे माजी आमदार तथा प्रदेश  सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी कार्यक्रमासह त्यांच्या  उत्तम आरोग्यासाठी आई तुळजाभवानीस महाअभिषेक पुजा  व महाआरती करण्यात आली.

 मागील 19 वर्षापासून तुळजापूर शहरात येथील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित विविध सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा  केला जातो. 

प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी येथील  भाजपच्या वतीने त्यांच्या  वाढदिवसानिमित आई तुळजाभवानीस महाअभिषेक व महाआरतीने त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी तुळजाभवानीस साकडे  घातले. त्यानंतर 101 गरजू महिलांना साड्या, तुळजाभवानी मंदिरासमोर गरजूंना अन्नदान करुन वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य गुलचंद व्यवहारे,भाजपा जेष्ठ नेते नागेश नाईक,तालुका सरचिटणीस शिवाजी बोधले, शहराध्यक्ष शांताराम पेंदे,उद्योग आघाडी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ मलबा, तालुका उपाध्यक्ष विकास मलबा,  बेटी बचाव बेटी पढावचे जिल्हा संयोजक इंद्रजित साळुंके,प्रसाद पानपुडे,बाळासाहेब भोसले, सागर पारडे,धैर्यशील दरेकर, ज्ञानेश्वर पांडागळे,मोर्डा गावाचे सरपंच ज्ञानेश्वर शिंदे आदी मान्यवरांसह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, तुळजापूर/काटी
9923005236

Post a Comment

0 Comments