तुळजापूर/उमाजी गायकवाड
बहुप्रतिक्षित जॉइंट एन्ट्रन्स एक्झाम अर्थात जेईई मेन्स जानेवारी सत्रात घेण्यात आलेल्या बी.ई/बी.टेक. शिक्षणक्रमाच्या प्रवेशासाठीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला.
या परीक्षेत तुळजापूरच्या व सध्या लातूर येथील केंब्रिज कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या रोहित विठ्ठल म्हेत्रे याने जेईई मेन्स परिक्षेत 95.32 पर्सेंटाइल गुणांने घवघवीत यश मिळवत आपला ठसा उमटवला. रोहितचे वडील यमगरवाडी विद्या संकूलात मुख्याध्यापक पदावर कार्यरत असून तेथेच रोहितने शालेय शिक्षण पूर्ण केले आहे.
शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये आयआयटी व यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील संस्थांमध्ये प्रवेशासाठी जेईई मेन्स परीक्षेचे करण्यात आले होते. या परिक्षेत कुठलेही ट्युशन क्लास न लावता रोहित म्हेत्रेने 95.32 पर्सेंटाइल गुण मिळवत घवघवीत यश संपादन करीत तुळजापूर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून रोहितचे सर्वत्र कौतुक होत आहे.
रोहितच्या या यशाबद्दल लातूर येथील केंब्रिज कॉलेजचे प्राचार्य डॉ. पाटील यांच्यासह नितीन माळी,खंडू काळे,कोंडीबा देवकर, अतुल इनामदार ,दयानंद भडांगे,अनिल घुगे,गणेश कुलकर्णी, शिक्षकवृंद यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, तुळजापूर/काटी
9923005236
0 Comments