Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

राज्यात वकील संरक्षण कायदा अंमलात आणला जावा. बार्शी वकील संघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

बार्शी:- मंगळवार दिनांक 12 मार्च 2024 रोजी मुंबईत मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवास स्थानी शिवसेना प्रवक्ते योगेश केदार आणि बार्शी वकील संघाचे ॲड. गणेश हांडे यांनी मुख्यमंत्र्यांना वकील  संरक्षण कायदा अंमलात यावा याबद्दल निवेदन दिले.

वकील हे कोणत्याही न्यायिक व्यवस्थेचा सर्वात अपरिहार्य भाग असतात, ते न्यायालयाचे अधिकारी असतात आणि समाजात न्याय व्यवस्थापित करण्यात मदत करतात. अलिकडच्या काळात वकिलांवरील हल्ल्याच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. काही महिन्यांपूर्वीच नगर मधील राहुरी तालुक्यातील आढाव वकील दाम्पत्य यांची झालेली निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर राज्यभर आंदोलने झाली. सध्या राज्यात पत्रकार संरक्षण कायदा तसेच डॉक्टर संरक्षण कायदा अस्तित्वात आहे. अगदी त्याच धर्तीवर वकिलांच्या देखील सुरक्षेच्या दृष्टीने कायदा करणे गरजेचे असून निर्भय आणि मजबूत बार हा समाजातील न्याय प्रशासनाचा पाया आहे. त्यामुळे वकिलांच्या सुरक्षेसाठी कायदेशीर चौकट काळाची गरज आहे असे त्यांनी निवेदनात सांगितले. 

या निवेदनाची मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी तात्काळ  दखल घेत आपल्या सचिवांना योग्य त्या कार्यवाहीचा सूचना देत या संदर्भात विशेष वकिलांची टीम नेमून लवकरच सर्व अडचणी सोडवण्यात येतील असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

यावेळी ॲड.गणेश हांडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महात्मा गांधी यांचे पुस्तक भेट देऊन आभार मानले.

Post a Comment

0 Comments