Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तुळजापूर तालुक्यातील तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण; 18 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

तुळजापूर/उमाजी  गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील विविध शाळांतील 18 शिक्षकांना सप्टेंबर 2022-23 या शैक्षणिक वर्षातील पंचायत समिती व गटशिक्षणाधिकारी कार्यालय यांच्या  संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा तालुका स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचे  वितरण बुधवार दि.13 रोजी दुपारी  1 वाजता येथील पंचायत समिती सभागृहात आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी आ. राणाजगजितसिंह पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर खडकी येथील जिल्हा परिषद प्रशालेतील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत व महाराष्ट्र गीतांने उपस्थितांचे स्वागत केले.

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तुळजापूर तुळजापूर पंचायत समिती व गटशिक्षणाधिकारी कार्यालय यांच्या वतीने विद्यादानाचे काम करणाऱ्या शिक्षकांचा सन्मात व्हावा, शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन मिळावे तसेच त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी पुरस्काराने गौरवण्यात येत असल्याचे गटशिक्षणाधिकारी मेहरुन्नीसा इनामदार यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.

यावेळी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी शाळेत राबविण्यात येत असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमा यासंदर्भात चर्चा करून त्यामध्ये  काही सुचना  असतील तर सांगाव्यात त्या सोडविण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करु असे आश्वासन दिले.  यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने आ. राणाजगजितसिंह पाटील यांना तुळजापूर हे तीर्थक्षेत्र असल्याने या ठिकाणी शिक्षक भवनाची मागणी निवेदनात करण्याचा करण्यात आली.

या कार्यक्रमासाठी आ. राणाजगजितसिंह पाटील, भाजपचे  तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, गटशिक्षणाधिकारी मेहरुन्नीसा इनामदार, शिक्षण विस्तार  अधिकारी वाय.के. चव्हाण,अर्जुन जाधव शिक्षक संघटनेचे नेते शिक्षक सोसायटीचे माजी चेअरमन धनाजी मुळे, लालासाहेब मगर, कल्याण बेताळे, प्रशांत मिटकर,अनिल हंगरकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

तुळजापूर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकुण 200 शाळा आहेत, त्या सर्व शाळातील पुरस्कारासाठीच्या निकषाची तपासणी करण्यासाठी गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यिय समितीचे गठन करण्यात आले होते. 

या तालुका स्तरावरील शिक्षण समितीमार्फत शासनाच्या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी, विद्यार्थ्यांची गुणवता, शंभर टक्के प्रगत वर्ग, शाळा बाह्य मुलांची शोध मोहीम, लोकजागर विद्यार्थी लाभाच्या योजना विध्यार्थ्यापर्यंत पोचविणे या सर्वांची तपासणी करून, एकुण 18 शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड केली होती. यामध्ये 14 केंद्रातून 14 शिक्षक, माध्यमिक शाळेतील एक शिक्षक, एक केंद्र प्रमुख व  विषय साधन व विशेष शिक्षक पुरस्काराचा समावेश आहे 

शाळा निहाय या शिक्षकांचा आदर्श  शिक्षक पुरस्काराने झाला सन्मान
आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते प्राथमिक शाळेतील शिक्षक सांगवी मार्डी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील श्रीमती खडकीकर दिप्ती विश्वास, देवसिंगा (नळ) येथील फुलसुंदर अनंत श्रीहरी, हगलूर (तुळ) येथील महिंद्रकर संतोष अशोक, वागदरी येथील श्रीमती रेखा प्रभाकर साखरे, धनगरवाडीतील जळकोटे नागनाथ सिद्रामप्पा, इटकळ येथील श्रीमती भोसले जया माणिक,जळकोटवाडी (नळ) येथील राठोड अशोक धनाजी, सिंदगाव  येथील कुडकले धनराज मल्लिनाथ, दहिवडीतील माळी हर्षवर्धन पांडुरंग, काटगावमधील क्षीरसागर राजाभाऊ मल्लिकार्जुन, बसवंतवाडी येथील सुरवसे सुसेन बळीराम,बारुळ येथील मुलाणी अमीन जहिरोद्दीन, सलगरा (दिवटी) येथील श्रीमती लोभे गीतांजली आप्पाराव,गोंधळवाडीतील राऊत शंकर नामदेव, 
माध्यमिक शाळेतील शिक्षक नंदगाव येथील धोत्रे मोहन तानाजी, विषय साधन व्यक्ती गट साधन तुळजापूर केंद्रातील वाकडे मनोज गुंडाप्पा तर विशेष शिक्षक पुरस्कार भातंब्री  येथील श्रीमती अंबुरे प्रिती पार्श्वनाथ, व आदर्श केंद्र प्रमुख म्हणून तीर्थाचे केंद्रप्रमुख महाजन तानाजी इरप्पा यांचा शाल,श्रीफळ पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचलन भैरवनाथ कानडे यांनी केले.

यावेळी राणाजगजितसिंह पाटील,भाजपचे  तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, गटशिक्षणाधिकारी मेहरुन्नीसा इनामदार,शिक्षक संघटनेचे नेते धनाजी मुळे, लालासाहेब मगर, कल्याण  बेताळे, पवन सुर्यवंशी,अनिल हंगरकर,तालुका शिक्षक  सोसायटीचे माजी चेअरमन धनाजी मुळे,शिक्षण विस्तार अधिकारी वाय.के.चव्हाण, अर्जुन जाधव, तात्यासाहेब माळी, शिक्षक  संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन राऊत, माजी अध्यक्ष डि. बी. कदम,शिक्षक सोसायटीचे चेअरमन प्रशांत मिटकर, अविनाश मोकाशे,श्रीमती जयमाला उटणे, बालाजी माळी, माजी  चेअरमन दयानंद जवळगावकर,शोभा राऊत, विलास राठोड,सुखदेव भालेकर, बापू काळे, सोमा जामगावकर, राहुल  जाधव, इर्शाद शेख आदी मान्यवरांसह  तालुक्यातील शिक्षक, शिक्षक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा.....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, तुळजापूर/काटी
9923005236

Post a Comment

0 Comments