काटी/उमाजी गायकवाड
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाद्वारे बुधवार दि.13 मार्च रोजी शेतकरी जनआक्रोष मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काढण्यात आला. त्यानंतर पक्षाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या अध्यक्षतेखाली व राष्ट्रवादी नेते संजय (मामा) निंबाळकर, अल्पसंख्यकचे नेते काझी यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा आढावा बैठक घेऊन त्यामध्ये तुळजापूर विधानसभा अध्यक्षपदी तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील माजी सैनिक सावंत शिवाजी रामकृष्ण यांची तुळजापूर विधानसभा अध्यक्षपदाच्या नियुक्तीचे पत्र प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत देण्यात आले. यावेळी त्यांच्या निवडीबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्ह्याचे व सर्व तालुक्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवडीबद्दल सर्वांनी सावंत यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा...
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236
0 Comments