Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी येथील मनाल इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व गुणवंतांचा सत्कार संपन्न; चिमुकल्यांच्या अदाकारीने प्रेक्षक मंत्रमुग्ध

काटी/उमाजी गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील सावित्रीबाई फुले मा.सा. सेवाभावी संस्था काटी संचलित मनाल इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन व विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार सोहळा शनिवार दि. 9 रोजी सायंकाळी दिमाखात संपन्न झाला. यावेळी वानर सेनेतील वेशभूषेतील चिमुकल्यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.

प्रारंभी राजमाता जिजाऊ व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. धिरज पाटील, सरपंच आशाताई हंगरगेकर व माजी चेअरमन सयाजीराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान

यावेळी जागतिक महिला दिन व कै. हारुणमियॉं शेख यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला व गुणवंतांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल,श्रीफळ व पुष्पहार घालून सत्काराने सन्मानित करण्यात आले. 

यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र शासन जिजामाता कृषिभूषण पुरस्कार प्राप्त सौ. शुभांगी नाबाजी ढगे,महिला बचत गटाच्या सौ. सिंदू कुंभार, सौ. अनुराधा गायकवाड, आदर्श विद्यार्थी स्वरा बालाजी ढगे, आदर्श शिक्षक अक्षता सुहास शिंदे, आदर्श पालक अमोल वेदपाठक, आदर्श कर्मचारी आयेशा सिद्दिक बेग यांचा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. व महिलांसाठी ठेवण्यात आलेल्या लकी ड्रॉ सोडतीत सौ. साक्षी काळे यांना पैठणी तर माधुरी पवार व अमृता जमदाडे यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला

या सत्कार सोहळ्यानंतर मनाल इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. विविध मान्यवर, पालकांच्या उपस्थितीत चिमुकल्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या सायंकाळच्या वेळेस रंगलेल्या या स्नेहसंमेलनात कार्यक्रमात पारंपारिक वेशभूषा, कोळीगीत, लोकगीत, भारुड, नृत्य, लावणी, देशभक्तीपर गीते आदी विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमातील चिमुकल्यांच्या अदाकारीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका संध्याराणी खपाले व नौशाद शेख यांनी तर आभार मुख्याध्यापिका लक्ष्मी सुरडकर यांनी मानले.

या कार्यक्रमासाठी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. धीरज (भैय्या)पाटील, माजी  चेअरमन सयाजीराव देशमुख, लोकनियुक्त सरपंच सौ.आशाताई  हंगरगेकर, सुजित हंगरगेकर,माजी सरपंच अशोक जाधव, शामराव आगलावे,ग्रामपंचायत सदस्य प्रकाश सोनवणे,चंद्रकांत काटे, भैरीनाथ काळे,रामहरी लोंढे अमोल गावडे, बबन हेडे, उद्योजक रामेश्वर लाडूळकर, तानाजी हजारे,नाबाजी ढगे, प्रकाश गाटे, प्रदीप साळुंके, शिवलिंग घाणे, युसुफ शेख, मुख्याध्यापिका सौ.लक्ष्मी सुरडकर, रुबीना शेख, अक्षता शिंदे,अश्विनी छबीले, दीप्ती शिंदे दीपाली जाधव, खपाले, नौशाद शेख यांच्यासह पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236

Post a Comment

0 Comments