काटी /उमाजी गायकवाड
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंट्स ऑफ इंडियाच्यावतीने घेण्यात आलेल्या सनदी लेखापाल (सीए) इंटरमिजिएट परीक्षेत तुळजापूर तालुक्यातील काटी येथील विद्यार्थी जयदीप जयाजी देशमुख याने यश संपादन करीत शैक्षणिक क्षेत्रात काटीचे नाव उज्ज्वल केले असून तुळजापूर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
अतिशय कठीण व अवघड समजल्या जाणाऱ्या आणि फारच कमी प्रमाणात रिझल्ट लागणारी सीए इंटरमीडिएट ही भारतातील चार्टर्ड अकाउंटन्सी या अभ्यासक्रमाची दुसरी स्तरावरील परीक्षा असून जयदीपने जिद्द व चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. या परिक्षेसाठी देशातून 11667 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यामधून फक्त 3763 विद्यार्थी या परिक्षेत उत्तीर्ण झाले. म्हणजे एकूण या परीक्षेचा निकाल फक्त 30 टक्केच लागला आहे. यावरुन हि परिक्षा किती अवघड आहे हे लक्षात येते.
जयदीपने शालेय शिक्षण सोलापूर येथील हरिभाई देवकरण तर पदवीपर्यंतचे शिक्षण सोलापूरमधील संगमेश्वर महाविद्यालयात पुर्ण केले आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना राज्यस्तरीय क्रिकेटचे मैदान सुध्दा गाजवले होते.सध्या तो हडपसर पुणे येथे आय.सी.ॲन्ड असोसिएट या संस्थेत प्रॅक्टीकल ट्रेनिंग करत आहे. जयदीपच्या या यशाबद्दल काटीसह परिसरातून कौतुक होत आहे.
कर्वेनगर पुणे संस्थेच्या वतीने सत्कार
या दैदिप्यमान यश मिळवलेल्या विद्यार्थी व पालकांचा कर्वे नगर पुणे,संस्थेच्या वतीने अमित आपटे (प्रेसिडेंट ऑफ कॉस्ट अकाऊंट ऑफ इंडिया), एमआयटी पुणेच्या डॉ.अंजली माने, सीएमए निरज जोशी, श्रीकांत इपलपल्ली, भुषण भुतडा यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करुन सन्मानित करण्यात आले.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236
0 Comments